शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला तर शवविच्छेदनाची गरज आहे का?; ICMRने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 13:19 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत.

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही एक लाखांहून हून अधिक झाली असून आतापर्यंत 3400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 1 लाख 12 हजार 359 वर पोहचली आहे. यामध्ये 63 हजार 624 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 3 हजार 435 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत. कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाच पोस्टमार्टम अर्थात शवविच्छेदन करण्याची गरज आहे का? याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) आता महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास शवविच्छेदन केले जाणार नाही असा निर्णय ICMR ने घेतला आहे. तसेच याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले असेल तर शवविच्छेदन करण्याची गरज नसल्याचं देखील ICMR ने म्हटलं आहे.

डॉक्टर, शवगृह कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि शवविच्छेदन कोरोना साखळीत सामील असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका हा अधिक असतो. कोरोनाच्या संसर्गामुळे होणारे मृत्यू हे वैद्यकीय सेवेखाली एमएलसी प्रकरण असल्यामुळे शवविच्छेदनाची आवश्यकता नसते. फक्त उपचार करीत असलेल्या डॉक्टरांकडून मृत्यूचे आवश्यक प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे अशी माहिती आयसीएमआरने आपल्या कोविड 19 डेथ इन मेडिको-लीगल ऑटॉप्सीमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहात किती वेळ जिवंत राहतो व्हायरस?; ICMR ने दिलं उत्तरकोरोना रुग्णाच्या मृतदेहामध्ये व्हायरस किती वेळ जिवंत राहतो? तसेच त्याच्यामार्फत तो पसरतो का? याबाबत आता इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे. मंगळवारी आयसीएमआरला मृतदेहामध्ये किती वेळ व्हायरस असतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी उत्तर दिलं आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहात व्हायरस हळूहळू कमी होतो मात्र किती वेळेत तो कमी होतो याची माहिती नाही असं आयसीएमआरने म्हटलं आहे. तसेच रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करताना चिरफाड करण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीचा अवलंब करावा असंही आयसीएमआरने म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाने थैमान घातलेलं असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus News : 'ड' जीवनसत्त्वामुळे कोरोनावर करता येते मात?, शास्त्रज्ञ म्हणतात...

कुटुंब रुग्णालयात एकत्र झालं दाखल पण घरी परतली फक्त आई; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल

Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहात किती वेळ जिवंत राहतो व्हायरस?; ICMR ने दिलं उत्तर

CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल