शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

CoronaVirus News : कोरोनाच्या लढाईत कसं काम करतंय मोदी सरकार?; भारतीय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 4:30 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असंही मोदी म्हणाले. कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 49,000 हून अधिक झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदी सरकार कशापद्धतीने काम करत आहे याबाबत अनेक एजन्सी सर्व्हे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोरोना  सक्षमपणे लढण्यास समर्थ असल्याची माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. शहरी भागातील 87 टक्के भारतीय मोदी सरकारच्या कोरोनासंदर्भातील कामावर समाधानी असल्याचं म्हणत आहेत. इप्सॉस या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामधून ही आकडेवारी समोर आली आहे.

इप्सॉसने केलेल्या सर्व्हेनुसार, शहरी भागातील 87 टक्के लोकांनी कोरानाशी सामना करणाऱ्या मोद सरकारला हाय रेटींग दिलं आहे. कंपनीने 23 ते 26 एप्रिलदरम्यान जगभरातील 13 देशांमध्ये 26 हजार लोकांची याबाबत मते जाणून घेतली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही हे या लोकांना विचारण्यात आलं. यामध्ये 13 पैकी 9 देशांमधील बहुतांश नागरिकांनी त्यांच्या देशातील सरकार हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलत असल्याचं मत नोंदवलं आहे.

इप्सॉस इंडियाचे सीईओ अमित अडारकर यांनी भारत सरकारबाबत मत व्यक्त केलं आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तातडीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. तसेच इतरही अनेक महत्वाचे प्रतिबंधात्मक निर्णय सरकारने तातडीने घेतले. आता सरकारकडून ग्रीन झोनमध्ये काळजीपूर्वपणे कारभार आणि उद्योगधंदे सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेतले जात आहेत. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी सरकार ज्या पद्धतीने कोरोनाचा सामना करत आहे त्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे' असं अडारकर यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये शहरी भागातील 75 टक्के नागरिकांनी जागतिक आरोग्य संघटना चांगलं काम करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा

CoronaVirus News : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता; मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूNarendra Modiनरेंद्र मोदी