शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा भोंगळ कारभार! कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 11 दिवस केले उपचार, रेकॉर्डमध्ये 'निरोगी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 4:11 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: निरोगी असल्याचं सांगून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाचा रुग्णांच्या नातेवाईकांना आता त्रास सहन करावा लागत आहे. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. रुग्णालयाचा निष्काजीपणा कित्येकदा समोर आला आहे. अशीच भोंगळ कारभार दाखवणारी घटना आता समोर आली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आता रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत एक संतापजनक प्रकार उघड झाला आहे. एका रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अकरा दिवस उपचार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर त्यांना निरोगी असल्याचं सांगून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाचा रुग्णांच्या नातेवाईकांना आता त्रास सहन करावा लागत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एकता कॉलनीमध्ये राहणाऱ्या रामनारायण श्रोती यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण उपचारानंतरही काही दिवसांनी रामनारायण यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी नेण्याचं ठरवलं. त्यानंतर काही दिवसांनी रामनारायण यांचा मृत्यू झाला. डेथ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी गेले असता नातेवाईकांकडे डिस्चार्ज पेपर मागण्यात आला. 

माहितीच्या अधिकाराअंतर्गत झाली पोलखोल

नातेवाईकांनी रुग्णालयातून डिस्चार्ज पेपर घेतले नसल्याचं समोर आलं आहे. यावर रुग्णालयात चौकशी केली असता तुम्ही तुमच्या मर्जीने रुग्णांना घेऊन गेलात असं सांगण्यात आलं. डेथ सर्टिफिकेट हवं असल्याने माहितीच्या अधिकाराअंतर्गत याबाबत अर्ज करण्यात आला. यातून ही पोलखोल झाली आहे. रुग्णाच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवली. त्यामध्ये त्यांच्या वडिलांना 30 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आल्याचं दाखवण्यात आलं. मात्र खरं तर 19 एप्रिल रोजीच वडिलांचा मृत्यू झाला होता. 

संतापजनक! कोरोना मृताला दाखवलं निरोगी

कोरोना वॉर्डमध्ये त्यांच्या केस शीटवर 20 ते 30 एप्रिल दरम्यान सतत इंजेक्शन आणि औषधं दिल्याचं बिल देण्यात आलं. तसेच वॉर्डच्या रेकॉरमध्ये 30 एप्रिलपर्यंत त्यांच्यावर उपचार होत असल्याचं दाखवण्यात आलं. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही सर्व माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामनारायण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या रेकॉर्डमध्ये रुग्ण निरोगी असल्याचा उल्लेख असल्याने काही समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू