शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

CoronaVirus दिल्ली संकटात! कोरोना खतरनाक स्टेजमध्ये; चार व्यक्तींमागे एक पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 11:52 IST

राजधानी दिल्लीला आता कोरोनाने चांगलाच वेढा घातला असून या महामारीने चांगलेच हातपाय पसरले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकाचे केंद्र महाराष्ट्राकडून राजधानी दिल्लीकडे सरकू लागले आहे. आधीच गेल्या दोन महिन्यांपासून भूगर्भीय हालचालींमुळे १२ पेक्षा जास्त भूकंपाचे हादरे बसलेले असताना कोरोनाचाही स्फोट झाला आहे. यामुळे दिल्लीच्या राज्यपालांनी सर्वपक्षीयांची तातडीची बैठक बोलावली आहे. 

राजधानी दिल्लीला आता कोरोनाने चांगलाच वेढा घातला असून या महामारीने चांगलेच हातपाय पसरले आहेत. सोमवारी एकूण टेस्टपैकी २७ टक्के लोक कोरोनाबाधित सापडले आहेत. याबरोबर कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३०००० वर गेला आहे. एवढेच नाही तर दिल्लीतील आणखी एक आकडेवारी चिंता वाढविणारी आहे. दिल्लीच्या दर चार नागरिकांमागे एक कोरोना पेशंट सापडू लागला आहे. 

दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी बोलावलेल्या बैठकीला अरविंद केजरीवाल अनुपस्थित असून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया गेले आहेत. केजरीवाल यांना दोन दिवसांपासून ताप असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 

गेल्या २४ तासांच दिल्लीमध्ये ३७०० लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये 1007 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. गेल्या आठवड्यात हे प्रमाण २६ टक्के होते. 

कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोकादिल्लीतील वाढत्या रुग्णांमुळे आता राजधानी संकटात सापडली असून कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये 29,943 रुग्ण सापडले असून यापैकी 11,357 रुग्णच बरे झाले आहेत. तर 17,712 रुग्ण उपचार घेत आहेत. या साऱ्या घडामो़डींवर आजच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या आपत्कालीन विभागाची बैठकही होणार आहे. दिल्लीमध्ये सातत्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे तेथील हॉटस्पॉटमध्येही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये हॉयस्पॉटची संख्या वाढून १८३ झाली आहे. रविवारी ही संख्या १६९ एवढी होती. 

केजरीवालांची आज टेस्टअरविंद केजरीवाल यांची गेल्या रविवार (दि.7) पासून प्रकृती बिघडल्याचे समजते. त्यांना ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत आहे. रविवारी दुपारपासून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बैठका रद्द केल्या आहेत. तसेच, ते कोणालाही भेटले नसून त्यांनी स्वत: ला आयसोलेट केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदर्श गुप्ता आणि जुने मित्र कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock 1 चॅलेंज! या फोटोमधील 'मनीमाऊ'ला शोधून दाखवा; भलेभले थकले

चिंताजनक! कोरोनाचा दररोजचा आकडा १०००० समीप; आज 331 बळींची नोंद

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात

आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल