शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये जोडप्याने लढवली शक्कल, बाहुलीला बनवलं आजारी बाळ अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:49 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये एका जोडप्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी शक्कल लढवली आहे. त्यांनी बाहुलीला आजारी बाळ बनवलं आणि बाईकने प्रवास केला.

विशाखापट्टणम - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 33,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक विनाकारण लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. 

लॉकडाऊनमध्ये एका जोडप्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी शक्कल लढवली आहे. त्यांनी बाहुलीला आजारी बाळ बनवलं आणि बाईकने प्रवास केला. पण याच दरम्यान नेमके ते पोलिसांच्या तावडीत सापडले आणि पकडले गेले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाईकवर असलेल्या एका जोडप्याला पोलिसांनी अडवलं. मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे बाळाला रुग्णालयात घेऊन जायचं असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना थोडा संशय आला त्यांनी बाळाला पाहीलं असता प्रत्यक्षात बाळ नसून बाहूली असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी या जोडप्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी बाहुलीला आजारी बाळ केल्याचं कबूल केलं. लॉकडाऊनमध्ये आम्हाला प्रवास करायचा होता. त्यामुळे आम्ही असं केलं असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी एक अनोखी शिक्षा दिल्याची घटना समोर आली होती. काही लोक सध्या कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. अशीच एक व्यक्ती बाईकवरून बाहेर पडल्यावर पोलिसांनी त्याला शिक्षा केली. वाराणसीतील एका चौकात पोलिसांनी एका बाईकस्वाराला पकडलं तेव्हा त्याला आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करायला लावलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! पत्नीला कोरोना झाल्यामुळे पतीची आत्महत्या 

CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद

CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"

Rishi Kapoor passed away : "एक एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं कठीण"

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिसIndiaभारतDeathमृत्यू