शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 13:45 IST

हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

ठळक मुद्देहे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 22 मेरोजी 4.6 टक्क्यांवर पोहोचला.देशात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आहेत. येथे एकूण 27,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली : देशात 18 मेपासून लॉकडाउन-4ला सुरूवात झाली आहे. यात देशात लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यानंतर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, तब्बल 25 शहरी जिल्हे देशाची डोकेदुखी वाढवत आहेत. 

हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 4.6 टक्क्यांवर -भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 22 मेरोजी 4.6 टक्क्यांवर पोहोचला. यापूर्वी तो 4.2 ते 4.3 टक्क्यांच्या दरम्यान होता. या 25 जिल्यांमध्ये 16 मेरोजी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर 8 ते 41 टक्के होता. मात्र, 22 मेरोजी तो 11 ते 52 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे संपूर्ण देशातील दिवसाचा कोरोना पॉझिटिव्ह दर 16 मेपासून 22 मेदरम्यान 6 टक्क्यांच्या जवळपास राहिला. परिणामी देशाचा दर 4.6 टक्क्यांवर पोहोचला.

योगींचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाले- महाराष्ट्र सरकारनं 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर...

हे आहेत महाराष्ट्रातील 6 जिल्हे -या 25 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, मुंबई सबअर्बन, पालघर आणि रायगड या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, 22 मेरोजी येथील पॉझिटिव्ह दर 31 टक्के होता. जो, 16 मेरोजी 41 टक्के होता. पालघर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह दर 22 मरोजी वाढून 42 टक्के झाला आहे. नाशकात तो 5 टक्के, तर रायगडमध्ये 13 टक्के आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आहेत. येथे एकूण 27,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  

CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील जिल्हे -देशाची डोकेदुखी ठरलेल्या या 25 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र वगळता, राजधानी दिल्लीतील सर्व 10 जिल्हे, गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा, तामिळनाडूतील चेन्नई, तेलंगाणातील हैदराबाद, पश्चिम बंगालमधील हावडा, तर मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, मंदसौर आणि बुरहानपूर या जिल्ह्यांचा समावेश आहेत.

CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMumbaiमुंबईNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार