शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

CoronaVirus News : आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 18:34 IST

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की 'आता लढाई चेन ऑफ ट्रांसमिशनला ब्लॉक करण्याची आहे. यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केले जातील. संभाव्य कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात जे आले आहेत, त्यांचा शोध घेतला जाईल.

ठळक मुद्देआता छोटे-छोटे भागही कंटेंमेंट झोन म्हणून घोषित होणार -गावा-गावातील कंटेनमेंट झोन लक्षात घेऊन घरा-घरात तपासणी केली जाणारकंटेंमेंट झोनमध्ये कुठलीही कॉलनी, मोहोल्ला, म्यूनिसिपल वॉर्ड आणि पोलीस ठाण्याची हद्द असू शकते

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधातील लढाई आता दुसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. केंद्राने पुढील टप्प्यातील लढाईची रुपरेखाही तयार केली आहे. याचीच एक झलक आज पत्रकार परिषदेत बघायला मिळाली. या टप्प्यात छोटी शहरे आणि गावांमध्ये संभाव्य कोरोनाबाधितांची ओळख, त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध, तसेच त्यांच्यावरील उपचार, या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, आता गावा-गावातील कंटेनमेंट झोन लक्षात घेतले जातील आणि विशेष चमू तयार करून घरा-घरात तपासणी केली जाईल.

आता छोटे-छोटे भागही कंटेंमेंट झोन म्हणून घोषित होणार -आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की 'आता लढाई चेन ऑफ ट्रांसमिशनला ब्लॉक करण्याची आहे. यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केले जातील. संभाव्य कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात जे आले आहेत त्यांचा शोध घेतला जाईल. कोरोनाबाधित कोण-कोणत्या भागात आहेत. याचे विष्लेशन केले जाईल. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण आढळतील त्या ठिकानांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जाईल. यात कुठलीही कॉलनी, मोहोल्ला, म्यूनिसिपल वॉर्ड, पोलीस ठाण्याची हद्द, अथवा संपूर्ण शहरही येऊ शकते.'

गावा-गावात अन् घरा-घरात शोध मोहीम -गाव पातळीवरील तयारीचा खुलासा करताना अग्रवाल म्हणाले, 'ग्रामीण भागात एखादे गाव, काही गावांचा समूह अथवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे भाग, तसेच ग्राम पंचायतीचे भाग, कंटेनमेंट झेन म्हणून घोषित करावे लागतील. याच बरबोर, प्रत्येक कंटेमेंट झोनमध्ये एक बफर झोनही तयार करावा लागेल. यामुळे संबंधित कावातील हालचालींवर लक्ष ठेवता येईल. या बफर झोनमध्ये सर्वप्रकारची व्यवस्था निश्चित केली जाईल.'

विशेष चमूच्या माध्यमातून पार पाडले जाईल काम -अग्रवाल म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि संक्रमित लोकांना शोधण्यासाठी काही कठोर नियम लागू करावे लागतील. याचबरोबर विशेष चमूही तयार करावा लागेल, जो कंटेंमेंट झोनमध्ये घरा-घरात जाऊन तपासणी करेल. तसेच 'स्पेशल टीमने सर्वप्रकारच्या केसेसची सक्रियपणे तपासणी करावी. त्यांचा फोकस इन्फ्लुएंजासारखे आजार आणि श्वसनाशी संबंधित गंभीर आजारांवर (एसएआरआय) असावा. याची लक्षणे असणाऱ्या लोकांना शोधून त्यांची सॅम्पलींग केली जावी. सर्व कॉन्टैक्ट्स शोधले जावेत आणि नंतर त्यांचे क्लिनिकल मॅनेजमेंट केले जावे,' असेही अग्रवाल म्हणाले.

अशी आहे देशाची स्थिती -केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात जवळपास 35,043 कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी 25,007 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 8,889 जण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 564 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 1,147 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdoctorडॉक्टरPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र