CoronaVirus News : काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:24 PM2020-08-28T20:24:44+5:302020-08-28T20:57:25+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

CoronaVirus Marathi News Congress MP H Vasanthakumar dies of COVID-19 | CoronaVirus News : काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचे कोरोनामुळे निधन

CoronaVirus News : काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचे कोरोनामुळे निधन

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 33 लाखांवर गेली आहे. तर 60 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

एच वसंत कुमार हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथील काँग्रेसचे खासदार होते. काही दिवसांपूर्वी वसंत कुमार यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना 10 ऑगस्ट रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र याच दरम्यान कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 

कर्नाटक काँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. डी. के. शिवकुमार यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि कैलाश चौधरी यांनी देखील याआधी कोरोनाची लागण झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा', ट्रम्प यांचं मोठं विधान

CoronaVirus News : भारताकडे कधी असणार कोरोना लस आणि किंमत किती?, रिसर्चमधून आली आनंदाची बातमी

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा

Web Title: CoronaVirus Marathi News Congress MP H Vasanthakumar dies of COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.