CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 04:48 PM2020-05-10T16:48:20+5:302020-05-11T01:01:13+5:30

जर्मन  गुप्तचर संस्थेचा दावा सत्य सिद्ध झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताला बळकटी मिळेल. डब्ल्यूएचओ चीनचीच बाजू घेत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

CoronaVirus Marathi News china president xi jinping personally requestedwho-to hold back information about coronavirus | CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

Next
ठळक मुद्देजर्मन  गुप्तचर संस्थेचा दावा सत्य सिद्ध झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताला मिळेल बळकटीजर्मनीच्या गुप्तचर संस्थेने केला आहे चीनवर आरोपडब्ल्यूएचओने, या आरोपाचे खंडन करत एक निवेदनही जारी केले आहे

 
बर्लिन : चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना फोन करून, कोरोना व्हायरस महामारीसंदर्भात जगाला उशिराने माहिती द्या, असे सांगितले होते, असा गंभीर आरोप जर्मनीने केला आहे.  हा आरोप जर्मनीच्या गुप्तचर संस्थेने केला आहे. एवढेच नाही, तर जर्मनीतील साप्ताहिक, मॅगझीनने गुप्तचर संस्था बीएनडीच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

कोरोनाची माहिती लपवण्याचा आरोप -
बीएनडीनुसार, '21 जानेवारीला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस ए. गेबेरेयेसस यांना सांगितले, की त्यांनी, कोरोना व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो, ही माहितीही थांबवावी आणि महामारीसंदर्भात उशिराने इशारा द्यावा.' हे वृत्त मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर डब्ल्यूएचओने, वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच हे वृत्त खोटे असल्याचेही म्हटले आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News: दिलासादायक; "फ्लॅट नव्हे, लवकरच रिव्हर्स येईल 'कोरोना ग्राफ', आता 'स्वदेशी' टेस्टिंग किट्सने होणार तपासणी"

WHOने केले खंडन -
डब्ल्यूएचओने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की 'डॉ. टेड्रोस आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात 21 जानेवारीला कसल्याही प्रकारचे बोलने झाले नाही आणि त्यांचे कधी फोनवरही बोलने झाले नाही. अशा चुकीच्या बातम्याच डब्ल्यूएचओचे लक्ष विचलित करतात.'

आणखी वाचा - CoronaVirus News : भारत-अमेरिका 3 व्हॅक्सीनवर करत आहे काम, 'या' व्हायरसचा सामना करण्यासाठीही तयार केली होती लस

'चीनने कोरोनाचे माणसातून माणसात संक्रमण होते, यासंदर्भात 20 जानेवारीलाच केलीह होती. अर्थात ज्या फोनचा दावा केला जात आहे, त्या फोनच्या आधी. WHO ने 22 जानेवारीलाच सार्वजनिक रित्या जाहीर केले होते, की मिळालेल्या माहितीनुसार, वुहानमध्ये माणसातून माणसात संक्रमण होत आहे.' मात्र, जर्मन  गुप्तचर संस्थेचा दावा सत्य सिद्ध झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताला बळकटी मिळेल. डब्ल्यूएचओ चीनचीच बाजू घेत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा

Web Title: CoronaVirus Marathi News china president xi jinping personally requestedwho-to hold back information about coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.