CoronaVirus News: राहुल गांधींना प्रत्युत्तर देणारं 'ते' ट्विट भाजपाकडून अवघ्या काही मिनिटांत डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 10:39 AM2020-05-03T10:39:37+5:302020-05-03T10:42:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: राहुल गांधींकडून आरोग्य सेतु अ‍ॅपवर प्रश्न उपस्थित

CoronaVirus Marathi News bjp deletes tweet replying rahul gandhi over arogya setu app kkg | CoronaVirus News: राहुल गांधींना प्रत्युत्तर देणारं 'ते' ट्विट भाजपाकडून अवघ्या काही मिनिटांत डिलीट

CoronaVirus News: राहुल गांधींना प्रत्युत्तर देणारं 'ते' ट्विट भाजपाकडून अवघ्या काही मिनिटांत डिलीट

Next

नवी दिल्ली: देशावर कोरोनाचं संकट असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरोग्य सेतु अ‍ॅपवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. मात्र अवघ्या काही मिनिटांत भाजपानं ट्विट डिलीट केलं. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य सेतु अतिशय महत्त्वाचं असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करणं बंधनकारक करण्यात आलं. याशिवाय खासगी आणि सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना हे अ‍ॅप इन्स्टॉल करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी आरोग्य सेतु अ‍ॅपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अ‍ॅप वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.



राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपानं उत्तर देणं टाळलं. मात्र भाजपानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत त्यातून काय म्हणाल? असा प्रश्न विचारला. त्यांनी ट्विटसोबत एक फोटो पोस्ट केला. या फोटोत एक गाढव टाकीवर उभं असलेलं दिसत होतं. त्या टाकीवर काँग्रेस लिहिण्यात आलं होतं. हा खाली कसा उतरणार हा प्रश्न नाही, पण त्याला वर चढवलं कोणी हा प्रश्न आहे, असा मजकूर फोटोवर होता. मात्र अवघ्या काही मिनिटांत त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

मुंबईची आरोग्य यंत्रणा राज्य शासनाने ताब्यात घ्यावी; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्राची मागणी धुडकावून वित्तीय सेंटर गुजरातमध्ये; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

Web Title: CoronaVirus Marathi News bjp deletes tweet replying rahul gandhi over arogya setu app kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.