शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

coronavirus: देशात नोंदवला गेला रुग्णांचा तीन महिन्यांतील नीचांक, मृत्यूदरही कमी   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 5:49 AM

coronavirus News : देशभरात ३६,३७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैच्या मध्यापासून आतापर्यंतची ही सर्वांत कमी संख्या आहे. रुग्णांची एकूण संख्या ७९.४६ लाखांवर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : देशभरात ३६,३७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैच्या मध्यापासून आतापर्यंतची ही सर्वांत कमी संख्या आहे. रुग्णांची एकूण संख्या ७९.४६ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४८८ मृत्यू झाले असून मृतांची एकूण संख्या १,१९,५०२ झाली आहे.  देशात १८ जुलै रोजी ३६ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये दैनंदिन सरासरी ९० हजारांवर असलेली रुग्णसंख्या आता सरासरी ५५ हजारांवर आली. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही सरासरी ८० हजारांवरून ४५ हजारांवर आली आहे.  मृत्यूचे प्रमाण सप्टेंबरपासून १.५ टक्क्यावर कायम आहे. हे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली आणण्याचे प्रयत्न आहेत. रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी सणासुदीच्या काळात अधिक दक्षता बाळगणे गरजेची आहे.  

केरळात सर्वात कमी मृत्यूदर देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एक टक्क्यापेक्षा कमी मृत्यूदर आहे. केरळमध्ये मृत्यूदर सर्वांत कमी म्हणजे ०.३४ टक्के इतका आहे. दिवसभरात केरळमध्ये ४२८७, कर्नाटकात ४१३०, प. बंगालमध्ये ४१२१, महाराष्ट्रात ३६४५ आणि दिल्लीत २८३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

महाराष्ट्रात मृत्यू जास्तमहाराष्ट्रात दिवसभरात कोरोनामुळे ८५ जणांचे मृत्यू झाले. प. बंगालमध्ये ५९, दिल्लीत ५४, छत्तीसगढमध्ये ४३ आणि कर्नाटकात ४२ मृत्यूंची दिवसभरात नोंद झाली.  

रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर सध्या ६,२५,८५७ सक्रिय रुग्ण असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत  ७२ लाखांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने लागण होणाऱ्यांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीपेक्षा अधिक आहे.  

कोरोनाचे ७८ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 

जगातील अनेक देशांत कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. ज्या देशांनी स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केले होते तिथे कोरोनाने पुन्हा दस्तक दिली आहे. भारतात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूदरात घसरण होत आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कॅडिलाच्याही दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुढे जात आहेत. सीरम लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होत आहेत. याशिवाय ब्राझील, द. आफ्रिका आणि अमेरिकेत या लसीवरील चाचण्या सुरू आहेत. 

देशाचा रिकव्हरी रेट आता ९०.६२ झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाचे ७८ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. गत २४ तासांत पाचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात महाराष्ट्र, प. बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांत कोरोनामुळे ५८ टक्के मृत्यू झाले आहेत. राजेश भूषण यांनी सांगितले की, सुरुवातीला १ ते १० लाख कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी ५७ दिवस लागले, तर आता १० लाख रुग्ण बरे होण्यासाठी केवळ १३ दिवस लागले. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की, कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत