शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

LockdownNews : एक आई अशी ही : रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म, नंतर त्याला कडेवर घेऊन चालली 160KM अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 21:17 IST

बडवानी : सरकारच्या प्रयत्नांनंतरही हजारो मजूर, हजारो किमीचा पायी प्रवास करून आपापल्या घरी पोहोचत आहेत.  या मजुरांची व्यथा ऐकून ...

बडवानी : सरकारच्या प्रयत्नांनंतरही हजारो मजूर, हजारो किमीचा पायी प्रवास करून आपापल्या घरी पोहोचत आहेत.  या मजुरांची व्यथा ऐकून अंगावर अक्षरशः शहारे येतात. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर, नवजात बाळाला घेऊन पोहोचलेल्या एका मजूर महिलेची कहाणी एकली, तर थरकाप उडाल्याशिवाय रहात नाही. मुलाला जन्म दिल्यानंतर 1 तासाने त्याला कडेवर घेऊन, ही महिला तब्बल 160 किलो मीटरचे अंतर पायी चालून बिजासन बार्डरवर पोहोचली आहे. 

आणखी वाचा - LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन

या महिलेचे नाव आहे शकुंतला. ती आपल्या पतीसोबत नाशिकला रहात होती. प्रेग्नन्सीच्या 9 व्या महिन्यातच ती आपल्या पतीसोबत नाशिकहून सतना येथे जाण्यासाठी पायी निघाली. नाशिकहून सतनाचे अंतर जवळपास 1 हजार किलो मिटर एवढे आहे. तीने बिजासन बॉर्डरपासून 160 किलोमीटर आधीच 5 मेरोजी रस्त्याच्या कडेला एका मुलाला जन्म दिला. 

मुलाला घेऊन बिजासन बॉर्डरवर पोहोचली महिला -ही आई शनिवारी बिजासन बॉर्डरवर पोहोचली. यावेळी तिच्या हातातील नवजात मूल पाहून चेक-पोस्टवरील इंचार्ज कविता कनेश त्यांच्या जवळ तपासणीसाठी पोहोचल्या. त्यांच्याशी बोलल्या. तेव्हा सांगण्यासाठी काहीही शब्द नव्हते. या महिलेने 70 किलो मीटर चालल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरच एका मुलाला जन्म दिला. यावेळी त्यांना 4 महिला सहकाऱ्यांनी मदत केली. शकुंतलाचे बोलने ऐकून पोलीसही जाम झाले. 

आणखी वाचा - CoronaVirus News : धक्कादायक आरोप!; "उशिराने जाहीर करा कोरोनाची महिती, जिनपिंग यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना केला होता फोन" 

रस्त्यातच मिळाली मदत -शकुंतला यांचे पती राकेश कौल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, प्रवास अत्यंत खडतर होता. मात्र, रस्त्यात आम्हाला दयाभावही दिसून आला. धुळ्यात एका शीख कुटुंबाने नवजात मुलासाठी कपडे आणि आवश्यक साहित्यही दिले. लॉकडाउनमुळे नाशकात उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे नोकरीही गेली, असेही राकेश यांनी सांगितले.

आणखी वाचा - CoronaVirus News : भारत-अमेरिका 3 व्हॅक्सीनवर करत आहे काम, 'या' व्हायरसचा सामना करण्यासाठीही तयार केली होती लस

बिजासन सीमेवर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कविता कनेश यांनी सांगितले, की येथे समूहाने आलेल्या मजुरांना भोजन देण्यात आले. मुलांना चपलाही दिल्या. यानंतर प्रशासनाने त्यांना येथून घरी पाठवण्याची व्यवस्था केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरणWomenमहिलाMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिकDhuleधुळेPoliceपोलिस