शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 17:14 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

मल्‍लापूरम - कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल एक लाख 90 हजारांच्यावर गेला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य नसल्याने एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. इयत्ता नवव्या शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहता येत नसल्याने ही मुलगी अत्यंत निराश झाल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

विद्यार्थिनीचे वडील रोजंदारीवर काम करतात. लॉकडाऊनमुळे सध्या अत्यंत अल्प उत्पन्नावर घर चालवावे लागत आहे. 'घरामध्ये टीव्ही आहे. पण तो बंद आहे. टीव्ही दुरुस्त करण्याची गरज आहे असे तिने मला सांगितले होते. पण मी तो दुरुस्त करू शकलो नाही. तिने टोकाचे पाऊल का उचलले ते समजत नाही. मैत्रिणीच्या घरी जाऊ शकतेस असा पर्याय मी तिला सुचवला होता' अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपण पुढे शिक्षण घेऊ शकणार नाही किंवा आपल्या शिक्षणावर परिणाम होईल याची मुलीला चिंता सतावत होती. केरळचे शिक्षण मंत्री सी. रवींद्रनाथ यांनी या दुर्देवी घटनेबद्दल जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. कोरोनाच्या संकटात केरळ सरकारने एक जूनपासून ऑनलाईन शिक्षणवर्ग सुरू केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

'आता नरेंद्र मोदी कोठे आहेत?'; कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

टॅग्स :KeralaकेरळEducationशिक्षणDeathमृत्यू