शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: सामूहिक सुविधांसाठी शेतकऱ्यांना कर्ज, १० वर्षे सवलतीने वित्तसाह्य करणारी देशव्यापी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 06:10 IST

नवी दिल्ली : कृषि आधारित पायाभूत सुविधांची उभारणी व शेतीसाठी सामूहिक सोयी-सुविधा उभारणी यासाठी बँंका व अन्य वित्तीय संस्थांमार्फत ...

नवी दिल्ली : कृषि आधारित पायाभूत सुविधांची उभारणी व शेतीसाठी सामूहिक सोयी-सुविधा उभारणी यासाठी बँंका व अन्य वित्तीय संस्थांमार्फत दीर्घकालीन मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा एक स्वतंत्र निधी उभारण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या निधीतून एक देशव्यापी केंद्रीय योजना पुढील १० वर्षे राबविली जाईल.बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की, या योजनेनुसार बँका व अन्य वित्तीय संस्था एक लाख कोटींचा वित्त पुरवठा करतील. यंदा १० हजार कोटी रुपये व त्यापुढील तीन वर्षे प्रत्येकी ३० हजार कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली जातील.याखेरीज दोन कोटी रुपयांपर्यंतच्या अशा कर्जदारांना ‘एमएसर्इं’साठी असलेल्या ‘क्रेडिड गॅरन्टी फंडा’तून कर्जहमीही मिळेल. या हमीचे शुल्क सरकार भरेल, असेही तोमर म्हणाले. कर्जफेडीची मुदत किमान सहा महिन्यांनी व कमाल दोन वर्षांनी वाढविलीही जाऊ शकेल. ही योजना यंदापासून सन २०२९ पर्यंत राबविली जाईल. यामुळे शेती व शेतमाल प्रक्रिया उद्योगांना कर्जपुरवठा केला जाणार असल्याने यातून ग्रामीण भागांत फार मोठ्या प्रमाणावर नवे रोजगार उपलब्ध होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे.३ टक्के व्याज सरकार भरणारदोन कोटींपर्यंतच्या अशा कर्जांवर ३ टक्के ‘इन्टरेस्ट सबव्हेंशन’ लागू असेल. म्हणजे कर्जदाराचे ३ टक्केइतके व्याज सरकार भरेल. ही सवलत जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत लागू असेल. यासाठी सरकार खिशातून १०,७३६ कोटी खर्च करेल.

टॅग्स :agricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार