शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

CoronaVirus Live Updates : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 13:20 IST

CoronaVirus Live Updates Uddhav Thackeray And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली असून आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसची (CoronaVirus) दुसरी लाट लसीकरण आणि बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन लावूनही थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून सलग नव्या रुग्णांचा आकडा हा चार लाखांच्या पार येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांचा आकडाही कमालीचा वाढू लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,01,078 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,38,270 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली असून आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीकरणासाठी (Corona Vaccination) राज्यासाठी वेगळे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्या. कोविन अ‍ॅपवर सातत्याने समस्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अ‍ॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लसीकरण का महत्वाचे? 

कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्यानं लसींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी लसीकरण किती महत्वाचं आहे हे सांगणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होणारे रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून त्यांना वाचवता येतं, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. देशातील एकूण 1 लाख कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. यातून समोर आलेली अंतिम माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

कोरोना रुग्णांना सेवा देताना डॉक्टर्स सर्वात मोठ्या धोक्याचा सामना करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. कोरोना लसीमुळे डॉक्टरांना एक बुस्टर मिळाला आहे. लस घेऊनही कोरोना होत असला तरी त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. अगदी सात दिवसांतही रुग्ण बरा होतो. विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण होत नाही. त्यामुळे लसीबाबतच्या सर्व भ्रामक गोष्टींना बाजूला ठेवून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, अशी माहिती प्राध्यापक आर.के.धिमान यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र