"आकड्यांचा खेळ थांबवून लस पुरवा, मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास देश करणार नाही माफ"

By नितीन जगताप | Published: May 25, 2021 10:02 PM2021-05-25T22:02:12+5:302021-05-25T22:09:26+5:30

CoronaVirus Live Updates And Ashok Gehlot : तिसऱ्या लाटेत मुलांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केंद्र सरकारवर कोरोना लसीवरून निशाणा साधला आहे.

CoronaVirus Live Updates Modi Government should provide more vaccines to the states says rajasthan ashok gehlot | "आकड्यांचा खेळ थांबवून लस पुरवा, मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास देश करणार नाही माफ"

"आकड्यांचा खेळ थांबवून लस पुरवा, मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास देश करणार नाही माफ"

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या दोन कोटींवर पोहोचली असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा आणि काही ठिकाणी कोरोना लस ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचाही इशारा दिला आहे. तिसऱ्या लाटेत मुलांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केंद्र सरकारवर कोरोना लसीवरून निशाणा साधला आहे.

अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. आकड्यांचा खेळ बंद करून राज्यांना जास्तीत जास्त लस पुरवठा होईल, यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. सर्वांच्या लसीकरणाची व्यवस्था केली नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत यापेक्षाही भयंकर स्थिती होईल. चिमुकलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास देश कधीच माफ करणार नाही असं म्हटलं आहे. "पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लस उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करून इतर कंपन्यांनाही लस उत्पादनासाठी परवानगी आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. लस उत्पादनात भारत जगात आघाडीवर आहे. त्याचा उपयोग केला पाहिजे" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.

"देशाची लोकसंख्या ही 130 कोटींवर आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांनाही संसर्ग होईल. ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याने दुसऱ्या लाटेत जी गंभीर स्थिती झाली त्याहीपेक्षा भयंकर स्थिती तिसऱ्या लाटेत होईल आणि आपण मुलांना वाचवू शकणार नाही" असं देखील अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो" असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद असलेल्या 194 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.

धोका वाढला! "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो"; WHO प्रमुखांचा गंभीर इशारा

जगभरात अद्याप ही भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. वेगाने कोरोनाची लसीकरण केल्यानंतरही आजाराचा धोका संपणार नाही अशा गंभीर इशारा देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आणि त्याच्या नवनवीन व्हेरिएंटचा प्रसार होत आहे अशा वेळी कोणतीही खबरदारींबाबत शिथिलता बाळगणे चुकीचे ठरू शकते. संपूर्ण जग अखेरच्या महासाथीच्या आजाराचा सामना करत नाही. तर कोरोनाच्या तुलनेत आणखी घातक आणि संसर्गजन्य असलेल्या व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. टेड्रोस यांनी कोरोना लसीचा साठा करणाऱ्या देशांनाही यावेळी सुनावले. त्यांनी म्हटले की, लशीच्या वितरणात जगभरात अपमानास्पद असमानता निर्माण झाली आहे. जगातील एकूण 75 टक्के कोरोना लस फक्त 10 देशांमध्ये देण्यात आली आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates Modi Government should provide more vaccines to the states says rajasthan ashok gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.