शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 10:05 IST

CoronaVirus Live Updates India reports 53,476 new COVID19 cases and 251 deaths in last 24 hours: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिकेसारखा देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 11 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 5 महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

CoronaVirus Live Updates India reports 53,476 new COVID19 cases and 251 deaths in last 24 hours"

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 53,476 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 251 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,17,87,534 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 

गुरुवारी (25 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,476 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,17,87,534 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,60,692 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,95,192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,12,31,650 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 504.4 दिवसांवरून 202.3 दिवसांवर आला आहे. 1 मार्चला हा कालावधी 504 दिवस होता तो आता 23 मार्चला तो 202 दिवस झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या 80.90 टक्के आहे. 22 मार्चला 32.53 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा डोस देण्यात आला आहे. एकाच दिवसातील ही सर्वांत मोठी संख्या आहे. महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये 2,299 रुग्ण असून गुजरातेत 1,640 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक , हरियाणा व राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारीच्या मध्यावधीत भारतात नीचांकी रुग्ण संख्या होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स 1 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत लागू होणार आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतDeathमृत्यू