CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोना केसेसमध्ये 30 टक्क्यांनी वाढ, 13,154 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 961 वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 11:47 IST2021-12-30T11:33:49+5:302021-12-30T11:47:01+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात असतानाच आता नव्या रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोना केसेसमध्ये 30 टक्क्यांनी वाढ, 13,154 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 961 वर
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटीवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात असतानाच आता नव्या रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी (30 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 13,154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,48,22,040 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 80 हजार 860 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 98.38 टक्क्यांवर आहे. देशातील ओमायक्रॉनची एकूण रुग्णसंख्या 961 वर पोहोचली आहे.
India reports 13,154 new COVID19 cases in the last 24 hours; Omicron case tally rises to 961 with 263 cases in Delhi and 252 in Maharashtra pic.twitter.com/LEea2AP2UO
— ANI (@ANI) December 30, 2021
कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने प्रशासनाचं टेन्शन वाढवलं आहे. आरोग्य मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रुग्ण हे दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. ओमायक्रॉनचे दिल्लीमध्ये 263, महाराष्ट्रात 252, गुजरात 97, राजस्थान 69, केरळ 65, तेलंगणा 62 रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेने आता एक धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे डबल डेंजरस असल्याचं म्हटलं आहे. डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे.
परिस्थिती भीषण! ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून आणत आहेत 'कोरोनाची त्सुनामी', WHO ने केलं अलर्ट
ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून कोरोनाची त्सुनामी आणत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येत चिंतेत भर टाकलेली असतानाच आता WHO ने हा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी प्रचंड काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.