शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 10,423 नवे रुग्ण; 250 दिवसांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 10:20 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. 250 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 10 हजार 423 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (2 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,423 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,42,96,237 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4,58,880 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे.

देशात 1,06,85,71,879 लोकांचं झालं लसीकरण

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,53,776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,36,83,581 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 1,06,85,71,879 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दिल्ली सरकारने ऑक्टोबर महिन्यात तपासलेल्या कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या नमुन्यांपैकी 99 टक्के रुग्णांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) आढळून आला आहे. यावरून Sars-CoV-2 व्हायरसचा देखील शोध लागला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) ची स्थापना झाल्यापासून, दिल्लीतून 7,300 हून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये घेतलेल्या 54% आणि मे महिन्यात 82% नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला.

चिंताजनक! 99 टक्के नमुन्यांमध्ये Delta Variant आढळला

जेव्हा दिल्लीत कोरोनाचा कहर होता आणि एका दिवसात 28 हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात होती. यावेळी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. समोर आलेल्या डेटानुसार, त्यावेळी घेतलेल्या एकूण नमुन्यांपैकी 39 टक्के हा डेल्टा व्हेरिएंटचा होता. Sars-Cov-2 च्या डेल्टा व्हेरिएंटने इतक्या वेगानं लोकं संक्रमित केले की, काही आठवड्यातच त्याने अल्फा व्हेरिएंला देखील मागे टाकलं आणि दिल्लीत आता कोरोनाची सर्वात विनाशकारी लाट निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचे निरीक्षण करणार्‍या संशोधकांच्या मते, देशातील सर्वात सामान्यपणे आढळणारा प्रकार अजूनही डेल्टा (B1.617.2) आहे जो जवळपास निम्म्या नमुन्यांमध्ये आढळतो, त्यानंतर AY.4 डेल्टा स्ट्रेन येतो.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत