CoronaVirus Live Updates : चिंताजनक! देशातील 'या' राज्यात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; 6 दिवसांत 6700 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 02:59 PM2022-04-28T14:59:51+5:302022-04-28T15:07:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: दिल्लीत आतापर्यंत एकूण 18,78,458 संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 26,170 रुग्णांनी या कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

CoronaVirus Live Updates delhi records 1367 covid 19 cases one fatality more than 1000 corona cases for 6th consecutive day | CoronaVirus Live Updates : चिंताजनक! देशातील 'या' राज्यात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; 6 दिवसांत 6700 नवे रुग्ण

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! देशातील 'या' राज्यात कोरोना होतोय आऊट ऑफ कंट्रोल; 6 दिवसांत 6700 नवे रुग्ण

Next

नवी दिल्ली - दिल्लीत कोरोना व्हायरसचा कहर आता दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्लीत कोरोना संसर्गाची 1367 नवीन प्रकरणे समोर आली आणि याच दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. या कालावधीत संसर्ग दर 4.50 टक्के नोंदवला गेला. दिल्लीत सलग सहाव्या दिवशी संसर्गाची 1000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली.

आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार, दिल्लीत आतापर्यंत एकूण 18,78,458 संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 26,170 रुग्णांनी या कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यानुसार मंगळवारी शहरात एकूण 30 हजार 346 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मंगळवारी दिल्लीत संसर्गाची 1,204 प्रकरणे नोंदवली गेली, तर संसर्ग दर 4.64 टक्के होता. याआधी सोमवारी 1011 कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवण्यात आली होती आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

रविवारीही 1083 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून या साथीमुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, शनिवारी दिल्लीत कोविड-19 चे 1,094 नवीन रुग्ण आढळले आणि शुक्रवारी कोरोना व्हायरसची 1042 प्रकरणे नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे 13 जानेवारी रोजी दिल्लीत कोविड-19 चे विक्रमी 28,867 रुग्ण आढळले. 14 जानेवारी रोजी दिल्लीत संसर्ग दर 30.6 टक्के नोंदवला गेला.

राजधानी दिल्लीत गेल्या 6 दिवसांत कोरोनाचे 6701 रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, ज्या राजधानीत 11 एप्रिल रोजी कोरोनाचे फक्त 601 सक्रिय रुग्ण होते, तिथे आज सक्रिय रुग्णांची संख्या 4832 वर गेली आहे. मात्र, तरीही रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. दिल्लीतील रुग्णालयात आतापर्यंत फक्त 129 रुग्ण दाखल आहेत, तर 3336 रुग्ण अजूनही होम आयसोलेशनमध्ये आहेत. 
 

Web Title: CoronaVirus Live Updates delhi records 1367 covid 19 cases one fatality more than 1000 corona cases for 6th consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.