CoronaVirus Live Updates : "रुग्णालयात ऑक्सिजन नाही, माझ्या बाबांचं काय होणार?"; वडिलांच्या काळजीने लेकीची घालमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 02:18 PM2021-04-22T14:18:10+5:302021-04-22T14:28:07+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत.

CoronaVirus Live Updates corona lucknow hospital oxygen shortage ground report | CoronaVirus Live Updates : "रुग्णालयात ऑक्सिजन नाही, माझ्या बाबांचं काय होणार?"; वडिलांच्या काळजीने लेकीची घालमेल

CoronaVirus Live Updates : "रुग्णालयात ऑक्सिजन नाही, माझ्या बाबांचं काय होणार?"; वडिलांच्या काळजीने लेकीची घालमेल

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (22 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,30,965 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,84,657 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,91,428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,34,54,880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे. 

देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान एका मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र याच वेळी ऑक्सिजन पुरवठा नसल्याने वडिलांच्या काळजीने लेकीच्या जीवाची घालमेल होत आहे. 

"रुग्णालयात ऑक्सिजन नाही, माझ्या बाबांचं काय होणार?" असं म्हणत मुलीने ऑक्सिजनसाठी मदत मागितली आहे. तर अशा अनेक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांनाच ऑक्सिजन नसल्याने काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट केलं आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.