शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

CoronaVirus Live Updates : कडक सॅल्यूट! दागिने गहाण ठेवून दाम्पत्याने कोरोना रुग्णांसाठी दान केले 100 पंखे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 3:12 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेकजण विविध समस्यांचा सामना करत आहेत. याच दरम्यान रुग्णालयात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,79,257  नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3645 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेकजण विविध समस्यांचा सामना करत आहेत. याच दरम्यान रुग्णालयात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान अनेक मंडळी मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. गरजुंना मदतीचा हात देत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. एका दाम्पत्याने आपले दागिने गहाण ठेवून कोरोना रुग्णांसाठी 100 पंखे दिल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिंगनल्लूरच्या ईएसआय रुग्णालयात 600 बेडची सुविधा उपलब्ध आहे. याच रुग्णालयाच्या कोविड वॉर्डसाठी दाम्पत्याने 100 पंखे दान केले आहेत. विशेष म्हणजे या दाम्पत्याने रुग्णालय प्रशासनाला आपली ओळख सार्वजनिक करण्यास मनाई केली आहे. रुग्णालयात सर्व ठिकाणी एसी आहे. मात्र कोरोना रुग्णांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये एसीचा वापर करण्यास मनाई आहे. पंखे उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांची संख्या पाहता पंख्याची कमतरता भासत आहे. दागिने गहाण ठेवून 100 पंखे भेट दिलेल्या या दाम्पत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

ईएसआय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. रविंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आम्ही ही मदत स्वीकारण्यास तयार नव्हतो, परंतु देणगी घेतल्याशिवाय हे दाम्पत्य येथून जायलाच तयार नव्हतं. या दाम्पत्याने आपले 2 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून शंभर पंखे विकत घेतले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. मात्र कोरोनाच्या कठीण काळातही अनेकांनी आपलं दु:ख बाजुला सारून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशीच एक घटना अहमदाबादमध्ये देखील घडली आहे. 

कडक सॅल्यूट! कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावला; 15 लाखांची FD मोडून दाम्पत्य करतंय रुग्णांची सेवा

कोरोनामुळे एका दाम्पत्याने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर खचून न जाता त्यांनी कोरोनाच्या या महाभयंकर संकटात इतरांचा जीव वाचवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. दाम्पत्याने 15 लाखांची एफडी मोडून तो पैसा गरजुंच्या उपचारासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रसिक मेहता आणि कल्पना मेहता असं या गुजरातच्याअहमदाबादमधील दाम्पत्याचं नाव आहे. रसिक आणि कल्पना या सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात गरजुंना आवश्यकत ती सर्व मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतTamilnaduतामिळनाडूhospitalहॉस्पिटल