शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊन शिथिल झाल्याचा परिणाम?; गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 11:13 IST

Coronavirus Latest Marathi News: मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळले असून 195 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 46, 433 वर, तर त्यांपैकी 12,727 रुग्ण बरे झाले आहे. तर आता एकूण 32,134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 30 एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 1075 होती. परंतु गेल्या चार दिवसांत हा आकडा 1500च्या वर गेला आहे. म्हणजेच गेल्या चार दिवसात जवळपास 500 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी संपल्यानंतर देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूCentral Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य