Coronavirus :पहिले कर्तव्य! नवजात चिमुकल्याचा अंत्यविधीला ना वेळ देऊ शकलो ना पत्नीचे सांत्वन करू शकलो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:44 PM2020-04-11T20:44:43+5:302020-04-11T20:47:31+5:30

Coronavirus : या दरम्यान अर्जुनने दूरवरुनच कुटूंबातील नातेवाईकांशी बातचीत झाली.  

Coronavirus : The infant could not give time to the funeral procession or could console the wife pda | Coronavirus :पहिले कर्तव्य! नवजात चिमुकल्याचा अंत्यविधीला ना वेळ देऊ शकलो ना पत्नीचे सांत्वन करू शकलो

Coronavirus :पहिले कर्तव्य! नवजात चिमुकल्याचा अंत्यविधीला ना वेळ देऊ शकलो ना पत्नीचे सांत्वन करू शकलो

Next
ठळक मुद्देपोलीस कॉन्स्टेबल अर्जुनने कर्तव्याचा त्याग न करता कोरोनाच्या लढाईत आपले कर्तव्य बजावले आहे.अर्जुनची पत्नी सुमनही पोलिस विभागात कार्यरत आहे.

कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात प्रत्येकजण आपली भूमिका बजावत आहे, परंतु पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल अर्जुनने कर्तव्याचा त्याग न करता कोरोनाच्या लढाईत आपले कर्तव्य बजावले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कॉन्स्टेबल घरी गेले नव्हते. नवजात पुत्राच्या मृत्यूनंतरही ते काही काळ मूठमाती देण्यासाठी घरी आले आणि त्यानंतर नाहन (सिरमौर, हिमाचल प्रदेश) येथे पुन्हा परतले. या दरम्यान अर्जुनने दूरवरुनच कुटूंबातील नातेवाईकांशी बातचीत झाली.
 
दरम्यान, सिरमौर येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली एक जमातीला बद्दी येथे सोडण्यासाठी अर्जुन आपल्या पोलीस पथकासह गेले होते. खबरदारी म्हणून ते घरी जात नव्हते. नाहनच्या मुख्य चौकावर अर्जुन बर्‍याचदा कर्तव्यासाठी तैनात असतात. अर्जुनची पत्नी सुमनही पोलिस विभागात कार्यरत आहे.

गुरुवारी त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली, परंतु हृदयाचा ठोका काम असल्याने बाळाला वाचवता आले नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास बद्दी येथे सोडण्यास गेलेल्या अर्जुनला या गंभीर परिस्थितीत देखील आपल्या पत्नीस भेटता आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या पत्नीशी देखील दुरून बोलून सांत्वन केले आणि धीर दिला.

शुक्रवारी ते कोलर येथील आपल्या घरी गेले होते. मुलाला मूठमाती देण्याचा विधी पार पाडला आणि नंतर कर्तव्यावर परत रुजू झाले. अर्जुन म्हणाले की संकटसमयी कर्तव्य परत पाडणं हेच सर्वकाही आहे, परंतु कोरोनाचा संसर्ग रोखणे देखील आवश्यक आहे. अर्जुनच्या म्हणण्यानुसार त्याची आई घरी एकटी आहे. पत्नी शिलाईमध्ये आहे. गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले.

 

Web Title: Coronavirus : The infant could not give time to the funeral procession or could console the wife pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.