शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Coronavirus: इंडिगोच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू; हवाई क्षेत्रातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 09:02 IST

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,०३५ नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे.

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरातील 200हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. भारतातहीभारतात गेल्या २४ तासांत १,०३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यत देशात २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. त्यातच आता इंडिगो एअरलाईन्समधील एका कर्मचाऱ्याचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

कोरोनामुळे मृत  झालेल्या कर्मचाऱ्याचे वय साधारण 55 ते 60च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. हा कर्मचारी चेन्नईमध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर होता. शनिवारी मृत्यूनंतर आलेल्या रिपोर्टमध्ये हा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी इंडिगो कंपनी घेणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. पंरतु हवाई क्षेत्रामधील पहिलीच अशी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,०३५ नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. त्यापैकी ६ हजार, ६३४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९६९ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र मृतांची आकडा २८८ वर गेला आहे. मुंबई, दिल्ली ही महानगरे आणि तामिळनाडू राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे.

जगातील २११ देशांमध्ये आतापर्यंत १७ लाख, ३५ हजार रुग्ण आढळून आले, त्यापैकी १२ लाख, ३० हजार जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यापैकी ५० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, सुमारे ४ लाख रुग्ण या आजारातून बचावलेही आहेत. अमेरिकेमध्ये रुग्णांची संख्या ५ लाख, ३ हजारांवर गेली आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये १८ हजार, ९०० जण कोरोनामुळे मरण पावले आहेत आणि स्पेनमध्ये मृतांचा आकडा १६ हजार, ५०० वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने १३ हजार, २०० जणांचा तर ब्रिटनमध्ये ९ हजारांहून अधिक रुग्णांची बळी घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndigoइंडिगोIndiaभारतairplaneविमानChennaiचेन्नई