शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

Coronavirus in India : भारतातील मित्रांसाठी आम्ही तयार; ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 8:15 PM

सध्या देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या काही दिवसांपासून दिवसाला होत आहे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

ठळक मुद्देसध्या देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंदगेल्या काही दिवसांपासून दिवसाला होत आहे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून तब्बल तीन लाखांच्या वर रुग्णांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडत आहे. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांचीही गरज भासत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी काही देशांनी हात पुढे केला आहे. यापैकी ऑस्ट्रेलियानंदेखील भारताला मदतीचं आश्वासन दिलं आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतासोबत ऑस्ट्रेलियाही उभा आहे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी सांगितलं. "भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी त्यांच्यासोबत उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी या जागतिक आव्हानावर एकत्र काम करत राहू," असं स्कॉट मॉरिसन म्हणाले. यापूर्वी चीन आणि फ्रान्सनंही केला होता मदतीसाठी हात पुढेभारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला केला गोता. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत," असा संदेश इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला होता.अमेरिकेनंतर भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. "चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे," असं त्यांनी उत्तर देताना सांगितलं. "भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल," असंही वांग म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलियाchinaचीनFranceफ्रान्सNarendra Modiनरेंद्र मोदी