शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

CoronaVirus Today: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही सुरूच; 24 तासांत समोर आले 41649 नवे रुग्ण, 593 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 10:23 IST

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 37 हजार 291 रुग्ण बरे झाले आहेत. (CoronaVirus in India)

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अद्यापही संपलेली नाही. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 41 हजार 649 नवे रुग्ण समोर आले आहेत. तसेच 593 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 23 हजार 810 लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या, देसातील कोरोनाची स्थिती... (CoronaVirus India today 41649 new cases and 593 deaths in india)

गेल्या 24 तासांत 37 हजार 291 रुग्ण ठणठणीत - आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 37 हजार 291 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर आता देशातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 7 लाख 81 हजार 263 वर पोहोचली आहे. आता देशातील सक्रीय रुग्ण संख्या कमी होऊन 4 लाख 8 हजार 920 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात तब्बल 3 कोटी 16 लाख 13 हजार 993 कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

Corona Vaccine: कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिक्सिंग डोसची चाचणी?

तिसरी लाट केरळमधून येण्याची भीती - कोरोना साथीला आवर घालण्यासाठी केरळने केलेले प्रयत्न जगभरात नावाजले गेले होते. पण आता त्याच केरळमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र तेथील मृत्युदर कमी आहे. गेल्या चार आठवड्यांपासून देशातील २२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यात केरळमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट अद्याप आली नसली तरी तिची सुरुवात केरळमधून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या राज्याचा एकूण संसर्गदर १२.९३ टक्के असून दर आठवड्याचे प्रमाण ११.९ टक्के आहे. देशात केरळमध्ये अँटिबॉडीज तसेच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. चौथ्या सिरो सर्वेक्षणात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

CoronaVaccine: लस घेतल्यानंतर किती दिवस मिळेल संरक्षण?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती

ईशान्य भारतातही बिकट स्थिती - ईशान्य भारतातील १३ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये आसाम, मेघालय, मणिपूर. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या ५ राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. मेघालयमधील पश्चिम गारो हिल्स प्रदेशात कोरोना रुग्णांची आकडेवारी ११० टक्क्यांनी वाढली आहे. अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम सियांगमध्ये व मणिपूरमधील नोने भागात हे प्रमाण अनुक्रमे ३०० टक्के व २६६ टक्के आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू