शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दिलासा कायम, गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 09:47 IST

Coronavirus In India: गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आत असलेले नव्या रुग्णांचे प्रमाण आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक राहिले आहे.

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आत असलेले नव्या रुग्णांचे प्रमाण आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक राहिले आहे. (Coronavirus In India) मात्र चिंतेची बाब म्हणजे देशातील दैनंदिन मृत्यूंची संख्या मात्र अद्यापही तीन हजारांच्या वर नोंदवली जात आहे. (India reports 80,834 new COVID-19 cases, 1,32,062 patient discharges, and 3,303 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry)आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या ८० हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात देशात कोरोनामुळे तीन हजार ३०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ लाख ३२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  त्यामुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण अधिकच घटले आहे. 

दरम्यान, गेल्या २४ तासांतील ८० हजार ८३४ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ३ हजार ३०३ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ७० हजार ३८४ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ३२ हजार ०६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ८० लाख ४३ हजार ४४६ एवढी झाली आहे. देशात सध्या १० लाख २६ हजार १५९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २५ कोटी ३१ लाख ९५ हजार ४८ जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या