शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

CoronaVirus News: ...तर आज भारत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत तिसऱ्या स्थानी जाणार; 'या' देशाला मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 11:55 AM

गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; एकूण रुग्णसंख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर

मुंबई: लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशातील कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार ८५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे. ही आकडेवारी पाहता आज भारत रशियाला मागे टाकण्याची दाट शक्यता आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहोचली आहे. तर रशियातील रुग्णसंख्या ६ लाख ७४ हजार ५१५ इतकी आहे. भारतातील कोरोना रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता भारत आजच रशियाला मागे टाकू शकतो.भारतात गेल्या २४ तासांत ६१३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दगावलेले नाहीत. देशात सध्याच्या घडीला २ लाख ४४ हजार ८१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १९ हजार २६८ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत असल्याचं अधोरेखित झालं आहे.भारत आणि रशियाची तुलना केल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत जेमतेम दीड हजाराचं अंतर आहे. भारतातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग पाहता आज संध्याकाळपर्यंत भारत रशियाला मागे टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर जाईल. या यादीत अमेरिका (२९ लाखांहून अधिक रुग्ण) पहिल्या, तर ब्राझील (१५.५ लाख रुग्ण) दुसऱ्या स्थानी आहे.गेल्या २४ तासांत देशभरात ६१३ कोरोना रग्ण मरण पावले. याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही कोरोना रुग्ण दगावले नव्हते. १६ जूनला देशभरात २ हजार मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र त्यावेळी दिल्ली आणि महाराष्ट्रातील आकडेवारीत गोंधळ झाला होता. त्यामुळे अचानक कोरोनामुळे झालेले मृत्यू वाढले. काल याच दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूंची नोंद झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाAmericaअमेरिकाBrazilब्राझील