काही दिवसांच्या दिलाशानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण, अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 11:21 AM2021-01-29T11:21:47+5:302021-01-29T11:23:40+5:30

1,71,686 जणांवर सध्या उपचार सुरू, तर आतापर्यंत 1,54,010 जणांचा कोरोनामुळे मृत्यू...

coronavirus india latest update After a few days relief the number of coronaviruses patients has risen again | काही दिवसांच्या दिलाशानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण, अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

काही दिवसांच्या दिलाशानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले एवढे रुग्ण, अशी आहे महाराष्ट्राची स्थिती

Next
ठळक मुद्देदेशात काही दिवसांच्या दिलाशानंतर पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ.देशात आतापर्यंत एकूण 1,07,20,048 जणांना कोरोनाची लागण.देशात आतापर्यंत 1,54,010 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

नवी दिल्ली : देशात काही दिवसांच्या दिलाशानंतर पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 18,855 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 163 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. काल 20,746 जणांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत एकूण 1,07,20,048 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 1,71,686 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1,54,010 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

दिलासादायक गोष्ट म्हणजे देशात आतापर्यंत 1,03,94,352 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 29,28,053 जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.

महाराष्ट्रात समोर आले 2,889 नवे कोरोनाबाधित -
महाराष्ट्रात 2,889 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. यानंतर आता गुरुवारी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 20,18,413 वर पोहोचली आहे. तर 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 50,944 वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी 3,181 जणांनी कोरोनावर मात केली असून आता कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 19,23,187 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 43,048 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय काल गुजरातमध्ये 346 नवे रुग्ण समोर आले, तर 602 जण संक्रमणमुक्त झाले आहेत. मध्यप्रदेशात 226 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावी, दादर पुन्हा शून्यावर -
कोरोनाचा प्रसार रोखण्यात जी उत्तर विभागातील दादर आणि धारावी परिसर यशस्वी ठरले आहेत. या दोन भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक अंकी असल्याचे दिसून येत आहे, तसेच आतापर्यंत तीन वेळा या भागांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही, तर माहीममध्येही केवळ ११६ सक्रिय असल्याने जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्यात धारावीत पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर झपाट्याने येथील झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग वाढला. मात्र, चेस द व्हायरस, फिव्हर क्लिनिक, अशा अनेक उपक्रमांनी येथे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला.

Web Title: coronavirus india latest update After a few days relief the number of coronaviruses patients has risen again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.