शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

CoronaVirus : 2-3 वर्षांतच होऊ शकतो कोरोनाचा खात्मा, फक्त करावं लागेल 'हे' मोठं काम; अदर पूनावालांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 17:05 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अदर यांनी आपल्या सर्वच प्लांटमध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना लस तयार करण्याच्या कामात लावले आहे.

नवी दिल्ली - सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी लसींच्या (Vaccine) पुरवठ्यासंदर्भातील आव्हानांवर चर्चा केली आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी काय करायला हवे, यावर त्यांनी भाष्य केले. ते बुधवारी इंडिया ग्लोबल फोरम 2021ला संबोधित करत होते. (CoronaVirus India global forum 2021 Adar Poonawala says to tackle coronaVirus we will have to adopt this approach)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अदर यांनी आपल्या सर्वच प्लांटमध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना लस तयार करण्याच्या कामात लावले आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी ज्या देशांकडे लस तयार करण्याची अधिक क्षमता आहे, अशा देशांनी समोर यायला हवे, असेही अदर यांनी म्हटले आहे. 

"कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांना 'भारतरत्न' द्या", नेत्याची मागणी; मोदींना लिहिलं पत्र 

अदर म्हणाले, "ही महामारी 2-3 वर्षांत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अशात आपल्याला लशीची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल. पाच वर्षांच्या आतच दुसरी महामारीही येऊ शकते. पुन्हा आपल्याला नव्याने गोष्टींना सुरुवात करावी लागेल. त्यामुळे आपण पुढील 15 वर्षांसाठी आपली क्षमता का विकसित करू नये."

युरोपियन मेडिसिन एजन्सीची मंजुरी मिळण्याचा विश्वास -येत्या महिन्याभरात आपल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला कोविशिल्डला युरोपियन मेडिसिन एजन्सीची मंजुरी मिळण्याचा भरवसा असल्याचेही पूनावाला यांनी नमूद केले आहे. "व्हॅक्सिन पासपोर्टचा मुद्दा देशांदरम्यान परस्पर आधारावर असला पाहिजे. ईएमएमध्ये अर्ज करण्यासाठी सांगण्याचा मुद्दा अगदी योग्य आहे. आमचे भागीदार अॅस्ट्राझेनकाच्या माध्यमातून ते एका महिन्यापूर्वीच करण्यात आले आहे आणि त्यासाठी एक वेळही लागतो," असेही पूनावाला म्हणाले. 

CoronaVirus News: अब तक ९! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच मोठा दिलासा अपेक्षित

ईएमएकडे केला अर्ज -यूके एमएचआरए, डब्ल्यूएचओ यांच्या मंजुरी प्रक्रियेसदेखील वेळ लागला आणि आम्ही ईएमएकडे अर्ज केला. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की एका महिन्यात ईएमए कोविशिल्ड लसीला मंजुरी देईल. याला WHO, इग्लंड एमएचआरएद्वारे मंजुरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत