शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Coronavirus India Updates : कोरोनाचा कहर! देशात दर मिनिटाला 117 नवे कोरोनाबाधित, दर तासाला 38 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 14:36 IST

या नव्या कोरोना रुग्णांची ही संख्या कुणाच्याही मनात धडकी भरवणारी आहे. सध्या देशात तासागणिक 7038 नवे कोरोना रुग्ण समोर येत आहेत. तर... (Coronavirus situation)

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. याच वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लवकरच रोजच्या रोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा दोन लाखाच्याही पुढे जाईल. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर विक्रमी 904 जणांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus situation is getting worse 117 new covid cases coming in india in every minute)

या नव्या कोरोना रुग्णांची ही संख्या कुणाच्याही मनात धडकी भरवणारी आहे. सध्या देशात तासागणिक 7038 नवे कोरोना रुग्ण समोर येत आहेत. यात दर मिनिटाला 117 नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. तर सध्या, प्रत्येक मिनिटाला 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. यावरून देशातील कोरोना स्थितीचे गांभीर्य लक्षात येते.  

 Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी, कोरोना नियमांच्या चिंधड्या; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह!

या लाटेची कोरोनाच्या आधीच्या लाटेशी तुलना केल्यास, 17 सप्टेंबर 2020ला कोरोनाने आपल्या पीकला स्पर्ष केला होता. त्यावेळी 97,894 नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. यावेळी देशात दर तासाला केवळ 4,079 नवे रुग्ण समोर येत होते. कोरोनाच्या मागील लाटेदरम्यान सर्वाधिक मृतांची संख्या 16 सप्टेंबर 2020 रोजी समोर आली होती. त्या दिवशी 1290 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तेव्हा दर तालासाला जवळपास 54 जनांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

काय म्हणतायत तज्ज्ञ -या आकडेवारीचा विचार करता, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृतांचा आकडा गेल्या लाटेच्या तुलनेत कमी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या मागे काही तांत्रिक कारण असू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे.

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले... 

...तर राज्यात (महाराष्ट्रात) मृत्यूंचा खच पडेल - कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करत आहेत. मात्र मला दोन आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा वाटतो. एवढेच नाही, तर राज्यात कडक लॉकडाऊन केला नाही आणि लोक भीती न बाळगता घराबाहेर पडतच राहिले तर राज्यात मृत्यूंचा खच पडेल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. रविवारी राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. रविवारी महाराष्ट्रात 63 हजार 294 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. राज्यात आतापर्यंत 34 लाख 07 हजार 245 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू