Coronavirus: तिहार तुरुंगातील कुख्यात दहशतवाद्याने व्यक्त केली कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची इच्छा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:07 PM2021-05-13T19:07:22+5:302021-05-13T19:12:52+5:30

Coronavirus in India: तिहार तुरुंगात बंद असलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कुख्यात दहशतवाद्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Coronavirus: "I want to treat corona patient!", Desire expressed by the notorious terrorist in Tihar Jail | Coronavirus: तिहार तुरुंगातील कुख्यात दहशतवाद्याने व्यक्त केली कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची इच्छा, म्हणाला...

Coronavirus: तिहार तुरुंगातील कुख्यात दहशतवाद्याने व्यक्त केली कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची इच्छा, म्हणाला...

Next

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. काही ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, औषधांची टंचाई निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी डॉक्टर आणि नर्सचाही तुटवडा आहे. अशा परिस्थितीत तिहार तुरुंगात बंद असलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कुख्यात दहशतवाद्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकरणी त्याने न्यायालयातही धाव घेतली आहे. 

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आरोपी सबील अहमद याने सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या अनुभवाचा फायदा या तुरुंगातील कैद्यांवरील उपचार आणि कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारांसाठी होऊ शकतो. अल कायदा इन द इंडियन सब-कॉन्टिनंटचा सदस्य राहिलेल्या अहमद याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने २२ फेब्रुवारी रोजी अटक केले होते. भारत आणि परदेशातील दहशतवादी संघटनांच्या सदस्यांना कथितपणे आर्थिक आणि अन्य मदत पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, अहमदचे वकील एम. एस. खान यांनी आरोपीने व्यक्त केलेल्या इच्छेबाबत तुरुंग प्रशासनाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती केली आहे. 
 
आरोपी सबील अहमद हा एमबीबीएस डॉक्टर आहे. तसेच गंभीर रुग्णांवर उपचार करण्याचा त्याला सात वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायगा सर्वसामान्य आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी करून घेता येऊ शकेल, असे त्याने म्हटले आहे. 
३० जून २००७ मध्ये ब्रिटनमधील ग्लासगो येथील विमानतळावर झालेल्या फिदायिन हल्ल्याप्रकरणी सबील अहमद हा आरोपी आहे. त्याला २० ऑगस्ट २०२० रोजी सौदी अरेबियाने भारताकडे प्रत्यार्पित केले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला ताब्यात घेतले होते.  

Web Title: Coronavirus: "I want to treat corona patient!", Desire expressed by the notorious terrorist in Tihar Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.