coronavirus : home ministry writes to all states to give special attention to keep the supply of medical oxygen vrd | coronavirus : कोरोनाग्रस्ताच्या उपचारात ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका; केंद्राचे राज्यांना निर्देश

coronavirus : कोरोनाग्रस्ताच्या उपचारात ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका; केंद्राचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करू नका, असं निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वच राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. कोरोना व्हायरसच्या दृष्टीने ऑक्सिजनचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

कर्मचार्‍यांना घरोघरी ऑक्सिजन युनिट्स नेण्याची सुविधा
भल्ला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय पुरवठा साहित्य व उपकरणे तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गॅस आणि लिक्विड ऑक्सिजन निर्माण करणारी सर्व उत्पादक युनिट, ऑक्सिजन सिलिंडर्सचे उत्पादन करणारे युनिट आणि त्यांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी करणाऱ्यांना कोणतीही बाधा येता कामा नये. तसेच ऑक्सिजन युनिट्सचा पुरवठा सुनिश्चित केला जावा. या पत्राद्वारे त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन युनिट त्यांच्या घरातून कारखान्यात नेण्याची परवानगी दिली आहे. परंतु संबंधित कामात सामाजिक अंतर राखणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 
सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत वेळेत माहिती देण्याच्या सूचना
यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या पद्धतींविषयी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व रुग्णालये आणि संबंधित कर्मचार्‍यांना ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून राज्यांनी गरजेनुसार पुरवठा करावा, असंही त्यांनी सुचवलं आहे. आज एकाच दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 708 नव्या रुग्णांची भर पडली असून, गेल्या 24 तासांत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 4281 वर पोहोचली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 851 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 318 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर तामिळनाडू आणि दिल्लीमध्येही रुग्णांचा आकडा 500च्या वर पोहोचला आहे.

Web Title: coronavirus : home ministry writes to all states to give special attention to keep the supply of medical oxygen vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.