कोरोना काळात केनियाहून आली 'अशी' मदत; मोदी सरकारवर निशाणा साधतायत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:53 PM2021-06-01T17:53:54+5:302021-06-01T17:55:18+5:30

भारतातील केनियाचे उच्चायुक्त विली ब्रेट म्हणाले, हे खाद्य पदार्थ दान देऊन कोविड-19 महामारीच्या काळात आम्हीही भारत सरकार आणि येथील लोकांसोबतच आहोत, हे दर्शविण्याची केनिया सरकारची इच्छा आहे.

CoronaVirus help came from kenya people started taunting the modi government | कोरोना काळात केनियाहून आली 'अशी' मदत; मोदी सरकारवर निशाणा साधतायत लोक!

कोरोना काळात केनियाहून आली 'अशी' मदत; मोदी सरकारवर निशाणा साधतायत लोक!

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताला जगातील अनेक देश मदत करत आहेत. मात्र, केनियातून खाद्य सामग्री येताच लोकांनी मोदी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.  लोक म्हणत आहेत, की विश्व गुरू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना ही मदद, कशा प्रकारचे चित्र दर्शवत आहे. सरकारने यावर विचार करायला हवा.

केनियाने कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला एक छोटी मदत म्हणून 12 टन खाद्य सामग्री पाठवली आहे. या पूर्वेकडील आफ्रिकन देशाने इंडियन रेड क्रॉस सोसायटीला 12 टन चहा, कॉफी आणि भूईमुगाच्या शेंगा दिल्या आहेत. तेथील लोकांनीच या सर्व गोष्टींचे उत्पादन केले होते. या खाद्य सामग्रीची पाकीट महाराष्ट्रात वाटली जातील, असे सरकारने म्हटले आहे. 

भारतातील केनियाचे उच्चायुक्त विली ब्रेट म्हणाले, हे खाद्य पदार्थ दान देऊन कोविड-19 महामारीच्या काळात आम्हीही भारत सरकार आणि येथील लोकांसोबतच आहोत, हे दर्शविण्याची केनिया सरकारची इच्छा आहे. ब्रेट म्हटले, हे खाद्य पदार्थ, जे लोक लोकांचा जीव वाचविण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत, अशा पुढच्या ओळीत काम करणार्‍या लोकांना देण्यासाठी आहे.  

केनियाच्या या मदतीवरून लोक सोशल मिडियावर सरकारविरोधात भडास काढत आहेत. सूरज सामंत नावाच्या एका हॅन्डलवरून लिहिण्यात आले आहे, की केनियाकडून एवढी मदत पाठवण्यात आली. मात्र, आपले सरकार सेंट्रल व्हिस्टाच्या कामात व्यस्त आहे. जे लोक असा विचार करतात, की त्यांनी मदत पाठवली असेल, तर आपण काय करू शकतो... तर त्यांना माझे उत्तर आहे, आपण अशा प्रकारेची मदत नाकारू शकतो. त्यांचे म्हणणे आहे, की 70 वर्षांत असे पहिल्यांदाच बघायला मिळाले.

आणखी एका युझरने लिहिले आहे, राहुल गांधी इटलीला गेले होते. तेथून त्यांनी सकारची छबी खराब व्हावी म्हणून, केनियाच्या नावाने मदत पाठवली. 

आणखी एका युझरने लिहिले आहे, जर नेपाळ मदीसाठी बोलू शकतो, तर केनियाने मदत पाठवली. एका यूझरने म्हटले आहे, की यामुळे जागतीक पातळीवर कशा प्रकारची प्रतिमा बनेल यावर सरकारने विचार करायला हवा. आता केनिया, नेपाळ सारख्या देशांच्या मदतीवर निर्भर होत आहोत.

Web Title: CoronaVirus help came from kenya people started taunting the modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.