शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 10:19 IST

Coronavirus : हरियाणातील एका तरुणाने मेक्सिकन तरुणीशी लग्न केलं आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या लग्नाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

रोहतक - देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 414 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण 12,380 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 99 जणांचा तर देशात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे.

हरियाणातील एका तरुणाने मेक्सिकन तरुणीशी लग्न केलं आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या लग्नाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. रोहतकच्या जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात हा विवाह झाला. रोहतकमध्ये राहणाऱ्या निरंजन कश्यपची तीन वर्षांपूर्वी मेक्सिकन मुलीशी ऑनलाईन मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये त्यांचा विवाह होणार होता, मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि तो विवाह सोहळा लांबणीवर पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी स्पॅनिश शिकत असताना एका अ‍ॅपच्या मदतीने निरंजन आणि डॅना यांची मैत्री झाली. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष विवाह अधिनियम (Special Marriages Act )अंतर्गत विवाह करण्याचे ठरवले. डॅना आणि तिची आई 11 फेब्रुवारी रोजी भारतात आले होते. लगेचच त्यांनी विशेष विवाह अधिनियम अंतर्गत अर्ज केला. 30 दिवसांनी लॉकडाऊनमध्ये अखेर 13 एप्रिल रोजी त्यांना जिल्हाधिकारी बोलवून घेतले आणि हा विवाह पार पडल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्... 

Coronavirus  : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे' 

२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणाmarriageलग्नIndiaभारतDeathमृत्यू