शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 15:27 IST

Coronavirus : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजार 435 पर्यंत पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 934 झाला आहेत.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही वेगाने वाढत आहे. भारतातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजार 435 पर्यंत पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 934 झाला आहेत. आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार वर गेला आहे. याच दरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची एक अत्यंत दिलासादायक आकडेवारी दिली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 7 दिवसांपासून देशातील तब्बल 80 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर 47 जिल्हे असे आहेत की जिथे मागच्या 14 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढलेला नाही. तर दुसरीकडे 21 दिवसांपासून देशाच्या 39 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित नवा रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे भारतातील 17 जिल्हे असे आहेत जिथे मागील 28 दिवसांपासून म्हणजेच जवळपास महिनाभरापासून कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 1543 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 29,435 झाली आहे. त्यातील 6,869 लोक बरे झाले असून 934 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर

Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू