Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:15 PM2020-04-28T13:15:22+5:302020-04-28T13:18:37+5:30

साथीच्या रोगांमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांसमोर मोठे आव्हान आहे.

Coronavirus: WHO warns all countries, malaria and polio may attack again pnm | Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक समुदायाला मलेरियाच्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे आवाहन आफ्रिका खंडातील बर्‍याच देशांना मलेरियाचा तीव्र फटका बसलाकोरोनासोबतच मलेरिया आणि पोलिओसारख्या गंभीर आजारांकडे लक्ष द्या

नवी दिल्ली – संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट असताना ३० लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे तर २ लाख १० हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच आता कोरोना व्हायरससोबतच मलेरिया आणि पोलिओसारख्या आजारापासून सुरक्षित राहा असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

 जागतिक आरोग्य संघटनेने नवीन समस्या सांगत डासांपासून अंतर ठेवण्यास सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूबरोबरच मलेरिया देखील उद्भवू शकतो. लोकांनीही डासांपासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. कोरोना विषाणूचा नाश होण्यास आणखी वेळ लागेल त्यामुळे सामान्य आरोग्य सेवा विस्कळीत होत आहे.

कोरोना विषाणू विरूद्ध लढा देण्याच्या मोहिमेबरोबरच देशांनी मलेरिया आणि पोलिओसारख्या प्राणघातक रोगांच्या निर्मूलनाच्या रोडमॅपचा अवलंब केला पाहिजे. वर्षानुवर्षे दोन्ही आजारांविरूद्ध सतत मोहिमेमुळे, त्यावर बर्‍याच अंशी नियंत्रण केले गेले आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गासंबंधीच्या अहवालात डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की साथीच्या रोगांमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांसमोर मोठे आव्हान आहे. परंतु आपल्याला इतर गंभीर प्रकारच्या आजारांकडे उदा. मलेरिया आणि पोलिओकडेही लक्ष द्यावे लागेल. सध्या युरोपात कोरोना-संक्रमित रूग्णांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे आणि अमेरिकेत १० लाखांचा आकडा पार केला आहे.

विशेष म्हणजे रविवारी पोप फ्रान्सिसनेही जागतिक समुदायाला मलेरियाच्या रुग्णांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. आफ्रिका खंडातील बर्‍याच देशांना मलेरियाचा तीव्र फटका बसला आहे. मलेरियामुळे सुमारे दहा लाख लोक आपला जीव गमावतात असं सांगितलं जातं. त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शनिवारी सांगितले की,  कोविड -१९ पासून बरे झालेल्या लोकांमध्ये अँन्टीबॉडी विकसित झाल्या आहेत आणि दुसऱ्यांदा ते कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित आहेत याचा पुरावा मिळालेला नाही. सध्या कोरोनामुळे विकसित देशांमधील आरोग्य सेवाही ढासळत आहे अशातच कोरोनापाठोपाठ मलेरिया आणि पोलिओसारखे आजारांनी पुन्हा डोकं वर काढलं तर लोकांच्या सुरक्षेसाठी ते घातक ठरु शकतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

‘या’ लोकांकडून भाजी खरेदी करु नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक वक्तव्य

कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईला मिळाली ‘सुपर मशीन’; आता दुप्पट क्षमतेने होणार लढाई!

अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोपे नसते; भाजपा नेत्याकडून शिवसेनेच्या टीकेचा समाचार

लोक कोरोनाशी लढताहेत; पण सरकार कुठे आहे?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ

Web Title: Coronavirus: WHO warns all countries, malaria and polio may attack again pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.