शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 13:40 IST

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 900 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. 

कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची आवश्यकता असेल त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. याच दरम्यान भारतात आणखी दोन औषधं ही कोरोना व्हायरला टक्कर देत असल्याची माहिती समोर आली आली आहे. सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने याबाबत माहिती दिली आहे. भारतात कोरोनावरील उपचारात दोन औषधांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. 

देशातील काही तज्ज्ञ डॉक्टरांचं एक टास्क फोर्स तयार करण्यात आलं आहे. कोरोनावरील औषधोपचारीची दिशा ठरवणं आणि त्यात बदल सुचवण्याचं काम त्याला देण्यात आलं आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन नंतर आता देशात Favipiravir आणि Tocilizumab ही औषधं जास्त परिणामकारक ठरल्याचं मत या टास्क फोर्समधल्या डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. भारतात जे काही प्रयोग केले गेले त्यामध्ये ही दोन औषधे प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं आहे. तर इतर काही देशांमध्ये  हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध परिणामकारक ठरलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सध्या कोरोनावरील उपचारासाठी 19 औषधांचा प्रयोग सुरू आहे. Chlroquine, HCQ, Remdesivir, Lopinavir/Ritonavir, Baloxavir Marboxil, Darunavir, Ribavirin+IFN betam Galidesivir, Oseltamivir, Umifenovir, Camostat mesylate, Ruxolitinib, Interferon beta, Tocolizumab, Ustekinumab, Nigericin, Teicoplanin आणि Ivermectin या औषधांचा त्यामध्ये समावेश आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजार 435 पर्यंत पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 934 झाला आहेत. आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे. त्यामुळे कोरोनाला मात देत बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा; कोरोनापाठोपाठ ‘या’ दोन आजारापासून सुरक्षित राहा!

CoronaVirus : ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूmedicinesऔषधंdoctorडॉक्टर