शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

Coronavirus: लस सर्वांना देणार, असं सरकारनं म्हटलंच नाही; केंद्रीय आरोग्य सचिवांचे कानावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 2:59 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी नुकताच अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा धावता दौरा केला.

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावाला वेसण घालणाऱ्या लसीच्या उपलब्धतेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारतातही लसीवर संशोधन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसनिर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच तीन शहरांचा धावता दौराही केला. कोरोना प्रतिबंधक लस प्राप्त करण्यासाठी हे असे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य सचिवांनी मात्र ‘कोरोनाची लस सर्व देशवासीयांना दिली जाईल, असे केंद्राने कधीही म्हटलेले नाही’, असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी नुकताच अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा धावता दौरा केला. तसेच देशभर लसीकरण मोहीम राबविण्यासाठी केंद्राने पूर्वतयारीही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना देशात लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल, असे विचारले असता ‘संपूर्ण देशाचे लसीकरण केले जाईल, असे केंद्र सरकारने कधीही म्हटलेले नाही’, असे स्पष्ट केले. 

आयसीएमआरची सारवासारवइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, लसीच्या परिणामकारकतेवर लसीकरण अवलंबून असेल. कोरोनाचा प्रसार करणारी साखळी तोडणे, हे आमचे प्रथम उद्दिष्ट असेल. कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस देऊन कोरोनाची साखळी आम्ही तोडली तर संपूर्ण देशवासीयांना लस टोचण्याची काही गरजच उरणार नाही, असे सांगत भार्गव यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.  

सगळ्या देशात लसीकरण केले जाईल, असे केंद्र सरकारने कधीही म्हटलेले नाही. अशा शास्त्रीय मुद्द्यांवर केवळ वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारावरच चर्चा होणे महत्त्वाचे आहे. - राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या