Coronavirus: कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींचा गावकऱ्यांच्या मदतीने विवाह, चार लाख रुपयांची सप्रेम भेटही दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:20 IST2021-05-24T09:20:08+5:302021-05-24T09:20:38+5:30
Coronavirus: या दोन मुलींपैकी मेघा ही पदवीधर असून, छोटी मुलगी वर्षा बी. ए. करत आहे. रोहतक जिल्ह्यातील ककरानाच्या गावकऱ्यांसह नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या या गावच्या लोकांनी या दोघींच्या विवाहासाठी मोठे योगदान दिले.

Coronavirus: कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींचा गावकऱ्यांच्या मदतीने विवाह, चार लाख रुपयांची सप्रेम भेटही दिली
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेले दिवंगत ठंडराम यांच्या दोन मुलींचा गावकऱ्यांनी विवाह करुन देत बंधुभावाच्या आदर्शाचे उदहारण घालून दिले. गावकऱ्यांनी या दोन्ही मुलींना त्यांच्या भावी संसारासाठी चार लाख रुपयेही भेट दिले.
या दोन मुलींपैकी मेघा ही पदवीधर असून, छोटी मुलगी वर्षा बी. ए. करत आहे. रोहतक जिल्ह्यातील ककरानाच्या गावकऱ्यांसह नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या या गावच्या लोकांनी या दोघींच्या विवाहासाठी मोठे योगदान दिले.
यात छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्याचे उपायुक्त रणबीर शर्मा, बॉलिवूड कलाकार शिवशंकर, सुप्रीम कोर्टाचे दिल्लीतील वकील शशिकांत आणि कारखानदार मलिक राजकमार यांनी शुभार्शिवादासोबत ऑनलाईनने सप्रेम भेट म्हणून रक्कम पाठवली. गावातील शिक्षक रामबीर यांनी ‘ककराना धाम’ या नावाने एक व्हॉटस्ॲप ग्रुप केला आहे.
या व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून नोकरी, व्यवसायानिमित्त देशातील विविध भागात राहणारे ककरानाचे लोक गावाच्या संपर्कात आहेत.