भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:27 PM2021-07-23T14:27:44+5:302021-07-23T14:30:27+5:30

"मी तीन आठवडे रुग्णालयात होतो. एक दिवस एका रुग्णाला लावण्यात आलेले मशीन सलग बीप करत होते. दोन तासांनंतर नर्स आल्या आणि त्यांनी ते मशीन बंद केले. तेव्हा कळले, की दोन तासांपूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि मी मृतदेहाच्या शेजारी असलेल्या बेडवर होतो"

CoronaVirus Frightening coronavirus wreaks havoc in southeast asia death toll from infection increased | भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण

भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण

Next

सध्या इंडोनेशिया कोरोना महामारीचे केंद्र बनले आहे. खरे तर संपूर्ण अग्नेय आशियाची स्थितीच बिघडली आहे. अनियंत्रित संक्रमणामुळे येथील मृतांचा ग्राफ वाढला आहे. इंडोनेशियात रुग्णांच्या गर्दीसमोर ऑक्सीजनचे संकट उभे ठाकले आहे. एक-एका श्वासासाठी रुग्ण धडपडत आहेत. (CoronaVirus Frightening coronavirus wreaks havoc in southeast asia death toll from infection increased)

मलेशियात रुग्णांच्या गर्दीमुळे पूर्वीपेक्षाही गंभीर स्थिती -
गर्दी वाढल्याने येथील स्थिती पूर्वीपेक्षाही वाईट झाली आहे. मलेशियामध्ये जमीन आणि स्ट्रेचरवर  उपचाराची वेळ आली आहे. तसेच म्यानमारमध्येही अत्यसंस्काराच्या ठिकाणी दिवस-रात्र मृतदेह दफन करण्याचे काम सुरू आहे.

रुग्णालयात मृत्यू समोरच नाचत होता -
मलेशियातील स्थितीवर बोलताना एरिक लॅम (38) म्हणाले, मी मलेशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या सेलांगोर शहरात राहतो. 17 जूनला कोरोना संक्रमनाची पुष्टी झाली. प्रकृती बिघडायला सुरुवात झाली, तेव्हा रुग्णालयात गेलो. तेव्हा  तेथील परिस्थिती पाहिली. मृत्यू समोर नाचू लागला, लोकांवर जमिनीवरच उपचार सुरू होते. लोक एक-एक श्वास घेण्यासाठी तडफडत होते. 

CoronaVirus: कोरोना काळात जगभरातील 15 लाख चिमुकले अनाथ, भारतातूनही समोर आला धक्कादायक आकडा

मी तीन आठवडे रुग्णालयात होतो. एक दिवस एका रुग्णाला लावण्यात आलेले मशीन सलग बीप करत होते. दोन तासांनंतर नर्स आल्या आणि त्यांनी ते मशीन बंद केले. तेव्हा कळले, की दोन तासांपूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि मी मृतदेहाच्या शेजारी असलेल्या बेडवर होतो, हा त्या काळातील सर्वात भयावह प्रसंग होता.

इंडोनेशियात कठोर लॉकडाउनची गरज - 
इंडोनेशियातील संक्रमण नियंत्रणाबाहेर गेले आहे. यातच तेथील सरकारने निर्बंध शिथील करण्याची घोषणा केली आहे. मात्र, डब्ल्यूएचओने गुरुवारी इंडोनेशियात कठोर लॉकडाउनची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की इंडोनेशियात संक्रमण नियंत्रणाबाहेर गेले आहे. गेल्या पाच आठवड्यांत संक्रमणाचा वेग पाच पट वाढला आहे. रोजच्या रोज मरणारांचा आकडा 1300 वर गेला आहे. हे पाहता 34 पैकी 13 प्रांतांत कठोर लॉकडाउनची आवश्यकता आहे. 

CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! तब्बल 40 लाखांहून अधिक चिमुकल्यांना कोरोनाची लागण; रिसर्चमधून दावा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Frightening coronavirus wreaks havoc in southeast asia death toll from infection increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app