शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

Coronavirus: नोकरदार आणि करदात्यांसाठी मोदी सरकारने घेतले ५ महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 11:21 IST

कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढविण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली:  देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत चालली आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आढळल्याने रुग्णांची संख्या ९,२०४ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत ३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यत देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढविण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेबरोबर सामान्य लोकांच्या मदतीसाठीही पाऊल उचललेले आहे. मागील महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सरकारने आतापर्यंत समाजातील विविध वर्गांसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर नोकरदार आणि करदात्यांसाठीही सरकारने अनेक निर्णयांची घोषणा केली आहे. 

ईपीएफ काढणे

सरकारने कोरोना विषाणूच्या संकटामुळे नोकरदारांसमोर आलेल्या अडचणी पाहता एक विशेष तरतूद केली आहे. त्या अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) खात्यातून तीन महिन्यांइतके वेतन काढण्याची सूट दिली आहे. या रकमेवर सेवा शूल्काचीही सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

जीएसटी विवरणपत्र

मार्च, एप्रिल आणि मेसाठी जीएसटी विवरणपत्र भरण्याची कालमर्यादा ३० जून २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

कर परतावा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक करदात्यांना १८ हजार कोटी रुपयांचा कर परतावा त्वरीत जारी करण्याची घोषणा केली. तसेच ५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित कर परतावा आणि जीएसटी/कस्टम परतावा त्वरीत जारी केले जातील अशी सूचना कर विभागाने दिली.

आधार-पॅन लिंकिंग

आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची कालमर्यादाही ३१ मार्चवरुन ३० जून २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताला.

प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्राप्तीकर भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जून २०२० केली आहे. उशिराने प्राप्तीकर भरल्यास द्यावे लागणारे व्याज १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे. 

भारतात 'कोरोना बॉम्ब' फोडण्याच्या तयारीत; नेपाळच्या राजकारण्याला अटक

मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'दुकाने', उद्योग सुरु ठेवण्याची मुभा

आय अ‍ॅम सॉरी! गंगा किनारी १० परदेशी फिरताना सापडले; शिक्षा पाहून 'हसाल'

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्थाTaxकरIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEmployeeकर्मचारीAdhar Cardआधार कार्डPan Cardपॅन कार्ड