शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: काँग्रेसच्या १००० बसेसवरुन वाद; प्रियंका गांधींच्या सचिवासह प्रदेश अध्यक्षाविरोधात एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 21:23 IST

मजुरांना घरी सोडण्यावरुन उत्तर प्रदेशात राजकारण जोरात; काँग्रेस, भाजपमध्ये जुंपली

लखनऊ: देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असताना उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि भाजपामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. प्रवासी मजुरांच्या मुद्दयावरुन दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. काँग्रेसकडून मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजपा सरकार त्यात आडकाठी करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या प्रकरणावरुन राजकारण तापलं असताना आग्रा जिल्ह्याच्या सीमेवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू उपस्थित होते. मात्र पोलिसांनी त्यांना पाय धरुन उचललं आणि ताब्यात घेतलं. यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. याशिवाय काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे स्विय सहाय्यक संदीप सिंह यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवला गेला आहे.अजय कुमार लल्लू यांनी पोलिसांनी ताब्यात घेताच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी ट्विट केलं. 'उत्तर प्रदेश सरकारनं आता हद्दच केली. राजकीय मतभेद बाजूला सारुन अडचणीत सापडलेल्या प्रवासी मजुरांना मदत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी आमच्यासमोर अनंत अडचणी आणल्या. योगीजी, आम्ही मजुरांसाठी पाठवत असलेल्या बसेसवर हवं तर भाजपाचे बॅनर लावा. तुमचे पोस्टर चिटकवा. पण आमची सेवा नाकारू नका. या राजकीय वादामुळे तीन दिवस वाया गेले आहेत. या तीन दिवसांत देशाच्या नागरिकांनी रस्त्यावर चालता चालता प्राण सोडले आहेत,' असं गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी प्रियंका गांधींचे स्विय सहाय्यक संदीप सिंह आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याविरोधात लखनऊच्या हजरतगंजमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'आम्ही गरीब मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सरकारनं संवेदनहीनतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या आहेत. मजूर त्यांच्या घरी पोहोचावेत, असं सरकारला वाटत नाही. मात्र आम्ही आमच्या बसेसच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा निश्चिय केला आहे, असं लल्लू म्हणाले. अखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊलश्रमिक रेल्वे गाड्यांबद्दल मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; महाराष्ट्राला मोठा फायदा होणार

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा