शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

Coronavirus: मृत समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले, ती महिला जिवंत परत येताच गावकरी घाबरले, मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 08:19 IST

Coronavirus in India: एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील जगगय्यापेटा येथे एका महिलेवर १५ दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र बुधवारी ही महिला सुखरूपपणे घरी आली. त्यानंतर...

विजयवाडा - आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील जगगय्यापेटा येथे एका महिलेवर १५ दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र बुधवारी ही महिला सुखरूपपणे घरी आली. वृद्ध महिला सुखरूपपणे घरी आल्याचे पाहून गावातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.  ( The family cremated the dead body, the villagers were scared when the woman came back alive)मिळालेल्या माहितीनुसार जगगय्यापेटा येथे राहणाऱ्या मुत्याला गिरिजम्मा नावाची महिला २० दिवसांपूर्वी आजारी पडली होती. तिला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कुटुंबीयांनी या महिलेला विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या जावयाने सांगितले की, माझ्या सासऱ्यांनी फोन करून गिरिजाम्मा यांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले. मात्र पुन्हा एका तासानंतर फोन करून त्यांची तब्येत अधिकच बिघडली असल्याचे सांगितले. त्यानंतर १२च्या सुमारास गिराजाम्मा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयाने माझ्या सासऱ्यांनी मुत्याला गिरिजाम्मा यांच्या नावाचे मृत्यू प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून स्मशानात नेऊन अंत्यसंस्कारही करण्यात आले.  या घटनेनंतर सुमारे आठवडाभरानंतर २३ मे रोजी गिरिजाम्मा यांच्या मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. पण काही दिवसांनंतर बुधवारी गिरिजाम्मा ह्या या एका ऑटोरिक्षामधून येऊन घरासमोर उतरल्या. गिरिजाम्मा यांना जिवंत पाहून गावकरी घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. काही ग्रामस्तांनी त्या भूत असल्याचा समज करून घेतला. गिरिजाम्मा यांच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यावर गिरिजाम्मा यांनी त्या रुग्णालयातून बऱ्या होऊन परत आल्याचे सांगितले.  कोरोनाचा संसर्ग झाल्यावर गिरिजाम्मा यांना १२ मे रोजी विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे पती त्यांना रुग्णालयात दाखल करून गावी परतले. १५ मे रोजी ते रुग्णालयात गिरिजाम्मा यांच्या बेडजवळ गेले असता तिथे त्या नव्हत्या. त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते. मात्र तिच्या पतीने डॉक्टरांना विचारले असता त्यांनी गिरिजाम्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच शवागारात जाऊन मृतदेह शोधण्यास सांगितले. तिथे ठेवलेला एक मृतदेह हुबेहूब गिरिजाम्मा यांच्यासारखाच होता. तोच कुटुंबीयांना सोपवण्यात आला. त्या मृतदेहावर त्यांनी अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या प्रकरणात डॉक्टरांचा बेफिकीरपणा दिसून आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAndhra Pradeshआंध्र प्रदेशDeathमृत्यूJara hatkeजरा हटकेhospitalहॉस्पिटल