शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Coronavirus : आता कोरोना चेहऱ्यापर्यंत नाही पोहोचणार; 'हा' भन्नाट आविष्कार विषाणू रोखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 10:25 PM

डीआरडीओनं बनवलेल्या या फेस शील्डमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे.

नवी दिल्ली: डीआरडीओ आणि विप्रो थ्रीडी यांनी एकत्रित मिळून संपूर्ण चेहरा झाकणारं एक कवच(फेस शील्ड) तयार केलं आहे. फेस शील्ड म्हणजेच ही ढाल कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसना मदतगार ठरणार आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना ही फेस शील्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीआरडीओनं बनवलेल्या या फेस शील्डमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे. तसेच ही फेस शील्ड पारदर्शक असल्यानं कोरोनाग्रस्तावर उपचार करताना डॉक्टरांना कोणतीही अडचण येणार नाही.  मास्क, पूर्ण शरीर सूट आणि पीपीईचा डीआरडीओ करतोय पुरवठा(फेस शिल्ड) चेहऱ्याला सुरक्षित ठेवणारं कवच तयार करण्यापूर्वीच डीआरडीओने मास्क, पूर्ण बॉडी सूट आणि बऱ्याच पीपीईचा आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरवठा केला आहे.कोरोना विषाणूने आतापर्यंत एकूण 4421 लोकांना संक्रमित केले असून, आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात कोरोना व्हायरसच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4421वर गेली असून, मृतांचा आकडाही 117वर पोहोचला आहे. मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या २४ तासांत ३४५ नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांच्या संख्येत घट झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या