Coronavirus : drdo and wipro 3d team came together to fight coronavirus created full face shield vrd | Coronavirus : आता कोरोना चेहऱ्यापर्यंत नाही पोहोचणार; 'हा' भन्नाट आविष्कार विषाणू रोखणार

Coronavirus : आता कोरोना चेहऱ्यापर्यंत नाही पोहोचणार; 'हा' भन्नाट आविष्कार विषाणू रोखणार

नवी दिल्ली: डीआरडीओ आणि विप्रो थ्रीडी यांनी एकत्रित मिळून संपूर्ण चेहरा झाकणारं एक कवच(फेस शील्ड) तयार केलं आहे. फेस शील्ड म्हणजेच ही ढाल कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसना मदतगार ठरणार आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना ही फेस शील्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीआरडीओनं बनवलेल्या या फेस शील्डमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे. तसेच ही फेस शील्ड पारदर्शक असल्यानं कोरोनाग्रस्तावर उपचार करताना डॉक्टरांना कोणतीही अडचण येणार नाही.  

मास्क, पूर्ण शरीर सूट आणि पीपीईचा डीआरडीओ करतोय पुरवठा
(फेस शिल्ड) चेहऱ्याला सुरक्षित ठेवणारं कवच तयार करण्यापूर्वीच डीआरडीओने मास्क, पूर्ण बॉडी सूट आणि बऱ्याच पीपीईचा आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरवठा केला आहे.


कोरोना विषाणूने आतापर्यंत एकूण 4421 लोकांना संक्रमित केले असून, आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात कोरोना व्हायरसच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4421वर गेली असून, मृतांचा आकडाही 117वर पोहोचला आहे. मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या २४ तासांत ३४५ नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोना बाधितांची संख्या आणि मृतांच्या संख्येत घट झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Coronavirus : drdo and wipro 3d team came together to fight coronavirus created full face shield vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.