शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय, 18 राज्यांत आढळले डबल म्यूटंट व्हेरिएंटचे सॅम्पल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 2:28 PM

coronavirus double mutant variant detected in 18 states says health ministry : 10,787 पॉझिटिव्ह सॅम्पलमध्ये आतापर्यंत एकूण 771 COVID-19 व्हेरिएंट (VOCs) सापडले आहेत. 

ठळक मुद्देमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जुन्यापेक्षा कितीतरी पटीने धोकादायक आहे.

नवी दिल्ली : Coronavirus Second Wave : कोरोना व्हायरस (Covid-19 Pandemic) महामारीचे संकट पुन्हा देशात वाढत चालले आहे. देशातील 18 राज्यात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट व्हेरिएंट (Double Mutant Variant) आढळले आहेत. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जुन्यापेक्षा कितीतरी पटीने धोकादायक आहे. (coronavirus double mutant variant detected in 18 states says health ministry)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी शेअर केलेल्या एकूण 10,787 पॉझिटिव्ह सॅम्पलमध्ये आतापर्यंत एकूण 771 COVID-19 व्हेरिएंट (VOCs) सापडले आहेत.  मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 'यामध्ये यूके (बी .1.1.7) व्हायरससाठी 736 सॅम्पल सामील आहेत. दक्षिण आफ्रिकी (B.1.351) व्हायरससाठी 34 सॅम्पल देखील पॉझिटिव्ह आढळले आहेत. एक सॅम्पल ब्राझील (P.1) व्हेरिएंट आहे, जो पॉझिटिव्ह आढळला आहे. देशातील 18 राज्यांत या VOCs च्या सॅम्पलचे निदान लागले आहेत.

डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हणजे काय?डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हणजे, एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे (टाइप) संसर्ग होतो. म्हणजेच, याला कोरोनाचे दुहेरी संक्रमण म्हटले जाऊ शकते. ब्राझीलमध्ये जगातील असे पहिले प्रकरण समोर आले होते. ब्राझीलमध्ये दोन रुग्णांना एकाच वेळी कोरोना व्हायरच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाल्याचे आढळले होते.

ब्राझीलमधील Feevale विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या व्हेरिएंटचे नाव P.1 आणि P.2 असे ठेवण्यात आले आहे. ज्यावेळी दुसर्‍या रुग्णाला कोरोनाच्या P.2 आणि B.1.91 व्हेरिएंटमुळे संसर्ग झाला. दरम्यान, ब्राझिलियन तज्ज्ञांनी केलेल्या या संशोधनाची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

पंजाबमध्ये 81 टक्के रुग्णांमध्ये UK व्हेरिएंट!पंजाबसाठी एक अतिशय चिंताजनक बाब समोर आली आहे. पंजाब सरकारने तपासणीसाठी पाठवलेल्या 401 सॅम्पल्सपैकी 81 टक्के सॅम्पलमध्ये यूकेतील स्ट्रेन आढळून आला आहे. दरम्यान, यूके स्ट्रेन अत्यंत घातक असून, सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लसयेत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. 45 वर्षांवरील प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जावडेकरांनी केले. आतापर्यंत केवळ सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस