शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

coronavirus: दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाला मात, आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 5:42 PM

सत्येंद्र जैन यांची आज केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आज त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.  

नवी दिल्ली - गेल्या आठवडाभरापासून कोरोनाशी झुंजत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनाला यशस्वीपणे मात दिली आहे. सत्येंद्र जैन यांची आज केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आज त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.  

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे गेल्या आठवड्यात निष्पन्न झाले होते.   सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची पहिली कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्या चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.

तेव्हापासून त्यांच्यावर दिल्लीतील साकेत परिसरातील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. ५५ वर्षीय जैन यांन प्लाझ्मा थेरेपीही देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. अखेर आज त्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आता त्यांना आजच रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली