Coronavirus delhi bjp mla lodges complaint against mob gathered at residence | राशन-५ हजार रुपयांच्या अफवेने भाजप आमदाराच्या घरी उसळली गर्दी; दाखल करावी लागली तक्रार

राशन-५ हजार रुपयांच्या अफवेने भाजप आमदाराच्या घरी उसळली गर्दी; दाखल करावी लागली तक्रार

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. याचा सर्वाधिक फटका गोरगरीबांना बसत आहे. त्यामुळे सर्व स्तरातून गरीबांना मदत करण्यात येत आहे. मात्र दिल्लीतील भाजप आमदाराला मदतीची अफवेमुळे अडचणींचा सामना करावा लागला. अफवेमुळे घरी जमलेली गर्दी हटवण्यासाठी चक्क पोलिसांना बोलवावे लागले.

दिल्लीतील करावल नगर मतदार संघाचे आमदार मोहन बिष्ट यांच्या घऱी राशन आणि आर्थिक मदतीच्या अफवेमुळं एवढी गर्दी जमली की, पोलिसांना बोलवावे लागले. त्यामुळे पोलिसांना तक्रार दाखल करून घ्यावी लागली. आमदार बिष्ट यांच्याकडून आधार कार्ड साक्षांकीत केल्यास सरकारकडून पाच हजार रुपये आणि राशन मिळणार अशी अफवा कोणीतरी पसरवली होती. त्यानंतर आमदार बिष्ट यांच्या घरी एकच गर्दी उसळली.

पहिल्या दिवशी बिष्ट यांनी काही लोकांचे आधार साक्षांकीत करून दिले. मात्र दुसऱ्या दिवशीही तशीच परिस्थिती होती. वाढलेली गर्दी पाहून आमदार बिष्ट यांनी उपस्थितांना समजावून सांगितले, लॉकडऊनमध्ये ऐवढी गर्दी करणे योग्य नाही. तरी देखील स्थानिकांची गर्दी कायम होती. अखेर  त्रस्त झालेल्या बिष्ट यांनी पोलिसांना सूचना देऊन तक्रार दाखल केली.

मोहन बिष्ट यांनी आरोप केला की, लॉकडाऊनच्या आधीच आम आदमी पक्षाच्या काही लोकांनी अफवा पसरवली की, आमदार बिष्ट यांच्याकडून आधार साक्षांकीत केल्यास पाच हजार रुपये आणि राशन मदत मिळेल. याची आपल्याला देखील माहिती नव्हती. त्यामुळे आम्ही येणाऱ्या लोकांचे आधार साक्षांकीत करत होतो. मात्र सोमवारी अचानक गर्दी वाढली. गर्दीमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले. त्यानंतर बिष्ट यांनी अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध तक्रार पोलिसांत तक्रार दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus delhi bjp mla lodges complaint against mob gathered at residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.